Ram Gopal Varma on The Kerala Story Esakal
मनोरंजन

Ram Gopal Varma: 'सत्याची कॉपी करणं..', 'द केरळ स्टोरी'च्या माध्यामातुन राम गोपाल वर्मांचा बॉलिवूडवर निशाणा..

Vaishali Patil

Ram Gopal Varma on The Kerala Story: 'द केरळ स्टोरी' रिलीज होऊन आता जवळपास तीन आठवडे उलटले आहेत. हा चित्रपट 5 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या ट्रेलरनंतरच या चित्रपटाबाबात वाद सुरु झाला होता. या चित्रपटामुळे अनेक वाद सुरु झाले.

या चित्रपटाबाबत दोन गट तयार झालेले दिसत आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातुन एका वर्गाला टार्गेट करण्यात येत आहे. हा चित्रपट प्रोपगंडा असल्याचा आरोपही केला जात असतांना पश्चिम बंगालमध्ये बंदी घालण्यात आली होती.

त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा चित्रपट प्रदर्शित करण्यात यावा असा आदेश दिला तर काही राज्यात हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. दुसऱ्या वर्गाचा या चित्रपटाला जोरदार पाठिंबा मिळत आहे. चित्रपटाच्या कथेने त्याच्या मनावर छाप सोडली असून त्यांना विचार करण्यास भाग पाडले असंही ते म्हणत आहे. त्यामुळेच 'द केरळ स्टोरी' सतत चर्चेत आहे.

या चित्रपटाबाबत अनेकांनी प्रतिक्रिया दिल्यात. ज्यात राजकिय नव्हे तर मनोरंजन विश्वातील चेहऱ्यांचाही सामावेश आहे. यातही काही या चित्रपटाचं समर्थन करत आहेत तर काही विरोध करत आहेत.

आता त्यातच बॉलिवूड चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मा यांनी देखील या The Kerala Story वर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यानी या चित्रपटाचे समर्थन करत बॉलीवूडवर धारदार टीका केली आहे.

ते म्हणाले की, 'केरळ स्टोरी हा एक सुंदर दिसणारा भयपट आहे, जो मुख्य प्रवाहातील बॉलीवूडचा मृत चेहरा त्याच्या सर्व कुरूपतेत दाखवतो.'

राम गोपाल वर्मा यांनी त्याच्या ट्विटरवर अनेक ट्विट केले आहेत. त्यांनी नाव न घेता इंडस्ट्रीतील एका वर्गावर निशाणा साधला आहे. ते पहिल्या ट्विटमध्ये म्हणतात की, 'आम्ही स्वतःशी आणि इतरांशी खोटे बोलण्यात इतके सोयीस्कर आहोत की जेव्हा कोणी पुढे जाऊन सत्य उघड करतं तेव्हा आम्हाला धक्का बसतो. #The Kerala Story ला मिळणाऱ्या यशावर बॉलीवूडच्या मौनासारखे हे मृत्यूचे स्पष्टीकरण देते.'

ट्विटमध्ये पुढे म्हणाले, 'केरळची कथा प्रत्येक कॉर्पोरेट हाऊस आणि बॉलीवूडमधील प्रत्येक कथेच्या कक्षेला एका गूढ धुक्याप्रमाणे सतावेल.' येत्या काही वर्षांत हा चित्रपट अनेकांना त्रास देईल, असंही त्यांनी लिहिलं.

चित्रपट ही वस्तुस्थिती आहे, त्यामुळे इंडस्ट्रीला त्यातून बरच काही शिकायचं नाही, कारण खोट्याची कॉपी करणं सोपं असतं, पण सत्याची कॉपी करणं खूप अवघड असते, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

Dharur Nagarparishad Election : धारूर नगरपरिषदेत चौरंगी लढत रंगणार! अध्यक्षपदासाठी १६, तर नगरसेवक पदासाठी तब्बल १५१ नामनिर्देशन पत्र दाखल

Latest Marathi Breaking News: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT