ram gopal verma and aryan khan 
मनोरंजन

आर्यनला 'सुपर डुपर स्टार' बनवणाऱ्या NCBचे आभार; राम गोपाल वर्मांचा टोला

'त्यांनी सुपरस्टारच्या मुलाला 'सुपर डुपर स्टार' बनवलं आहे.'

सकाळ डिजिटल टीम

'त्यांनी सुपरस्टारच्या मुलाला 'सुपर डुपर स्टार' बनवलं आहे.'

बॉलिवूडमध्ये सध्या आर्यन खानचं ड्रग्ज Aryan Khan Drugs Case प्रकरण फार चर्चेत आहे. आर्यनच्या अटकेनंतर सेलिब्रिटी आणि सर्वसामान्य चाहत्यांनी शाहरुख आणि त्याच्या कुटुंबीयांना पाठिंबा दर्शविला. आर्यनवर लावण्यात आलेल्या आरोपांमधून काहीही निष्पन्न होणार नाही, असे चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा Ram Gopal Varma यांनी म्हटले आहे. त्यांनी बुधवारी ट्विटरवर आर्यनविरोधातील ड्रग्ज प्रकरणावर आपले मत मांडले आहे. एनसीबीने आर्यन आणि इतर काही जणांना मुंबईच्या किनाऱ्यावरील क्रूझवर छापे टाकल्यानंतर अटक केलं होतं. यावर आता राम गोपाल वर्मांनी ट्विट करत एनसीबीवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

काय म्हणाले राम गोपाल वर्मा?

'शाहरुख खानच्या हुशार आणि खऱ्या चाहत्यांनी खरंतर एनसीबीचे आभार मानले पाहिजेत. कारण त्यांनी सुपरस्टारच्या मुलाला 'सुपर डुपर स्टार' बनवलं आहे. शाहरुखचा एक सच्चा चाहता म्हणून मला फक्त जय एनसीबी, असा नारा द्यावासा वाटतो. स्वतःच्या वडिलांपेक्षा, तुरुंगात आणि एनसीबीकडूनच आयुष्याबद्दल जास्त शिकायला मिळालं असं आर्यन भविष्यात म्हणेल अशी मी पैज लावतो,' असं ट्विटरवर त्यांनी लिहिलं. 'एजन्सीसह प्रत्येकाला माहित आहे की आर्यन खानवर लावलेल्या आरोपांमधून काहीही निष्पन्न होणार नाही. निकालात विलंब करण्यासाठी सर्व युक्त्या वापरून झाल्यानंतर तो नक्कीच बाहेर येईल", असं ते पुढे म्हणाले.

आर्यन आणि इतर आरोपींच्या जामिनावर सध्या सुनावणी सुरू आहे. आर्यनचा अमलीपदार्थ पुरवठा आणि कटकारस्थानमध्ये सहभाग आहे असा दावा एनसीबीच्या वतीने विशेष न्यायालयात करण्यात आला तर आर्यनच्या वतीने या दाव्याचे खंडन करण्यात आले आणि आर्यनकडे काहीही सापडले नाही, असा पुनरुच्चार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT