Ram Gopal Verma Speaks On Shahid's Jersey Movie. Google
मनोरंजन

शाहिदच्या 'जर्सी'चे राम गोपाल वर्मानं काढले वाभाडे, म्हणाला....

प्रदर्शनानंतर 'जर्सी' सिनेमाला बॉक्सऑफिसवर मिळणाऱ्या प्रतिसादावर राम गोपाल वर्मा यांनी टीका केली आहे.

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर(Shahid Kapoor) यांचा 'जर्सी'(Jersey) सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. पण प्रदर्शनापासूनच या सिनेमाची बॉक्सऑफिसवरची घोडदौड धीम्या गतीनं सुरू झाली. याची दोन कारणं बोलली जात आहेत,पहिलं हे की 'जर्सी' दाक्षिणात्य सिनेमाचा रीमेक आहे आणि दुसरं हे की जर्सी आधी प्रदर्शित झालेला अन् तुफान चालत असलेल्या केजीएफ चॅप्टर २ ला लोकांची अधिक मिळत असलेली अधिक पसंती.

ट्रेड अॅनलिस्टनी या दोन कारणांना जर्सीला प्रतिसाद न मिळण्यासाठी कारणीभूत ठरवलं आहे. यामध्ये आता प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्माने(Ram Gopal Verma) बॉलीवूड आणि दाक्षिणात्य सिनेमांविषयीचं आपलं मत मांडलं आहे. त्यांनी जर्सीला मिळणाऱ्या संथ प्रतिसादाचा आणि केजीएफ चॅप्टर २ ला मिळणाऱ्या जोरदार प्रतिसादाला पाहिल्यानंतर यावर आपलं मत मांडलं आहे. राम गोपाल वर्मा यांनी म्हटलं आहे की,''दाक्षिणात्य सिनेमाचं हिंदी रीमेक करण्याऐवजी मूळ सिनेमा पूर्ण हिंदीत डब करायला हवा होता''.

राम गोपाल वर्मा यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर एका पाठोपाठ एक असे कितीतरी ट्वीट्स केले आहेत. हिंदी मध्ये 'जर्सी' सिनेमाचा रीमेक हा एक चूकीचा प्रयोग आहे,कारण आता गेल्या काही दिवसांत हे सिद्ध झालं आहे की 'पुष्पा','आरआरआर' आणि 'केजीएफ चॅप्टर २' सारखे हिंदीत डब केलेले सिनेमे चांगली कामगिरी करीत आहेत. जर सिनेमाचं कथानक चांगलं असेल तर चांगलाच प्रतिसाद मिळणार. जर तेलुगु मधील नानीच्या मूळ सिनेमाला डब केलं गेलं असतं आणि मग प्रदर्शित केलं असतं तर निर्मात्यांना केवळ १० लाखाचा खर्च आला असता. पण रीमेक बनवण्यात १०० करोड लागले असतील,ज्यामुळे पैसा,वेळ,कष्ट सगळंच वाया गेलं''.

सोशल मीडियावर राम गोपाल वर्मा याचं हे ट्वीट जोरदार व्हायरल होत आहे. राम गोपाल वर्माच्या चाहत्यांनी या ट्वीटला जोरदार पसंती दर्शवली आहे. आणि नेटकरी यावर प्रतिक्रिया देत आहेत . जर्सी सिनेमा हा गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात शाहिद कपूरसोबत मृणाल ठाकूरही मुख्य भूमिकेत आहे. आतापर्यंत जर्सी सिनेमानं बॉक्सऑफिसवर काही खास कमाई केलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT