Ram Setu Trailer esakal
मनोरंजन

Ram Setu Trailer: 'भाऊ अंगावर आला काटा!' अक्षयच्या 'रामसेतू'च्या ट्रेलरनं वादळ

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या राम सेतूचा ट्रेलर आता व्हायरल झाला आहे. त्यावर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Ram Setu Trailer: बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या राम सेतूचा ट्रेलर आता व्हायरल झाला आहे. त्याच्या टीझरवरुन त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर आलेल्या ट्रेलरनं मात्र चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून अक्षयच्या ट्रेलरची चर्चा होती. अभिषेक शर्मा यांनी केलेल्या दिग्दर्शन केलेल्या राम सेतूवरुन अक्षय हा काही काळ वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. टीझरमध्ये दाखवण्यात आलेल्या एका रोबोटमुळे त्याला आर्यनमॅनची कॉपी असेही म्हटले गेले होते.

अक्षयच्या राम सेतूमध्ये जॅकलीन फर्नांडिझ, नुसरत भरुचा यांच्या भूमिका आहेत. येत्या 25 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याच्या ट्रेलरला मिळालेल्या प्रतिसादानं आता प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अनेकांनी अक्षयवर कौतूकाचा वर्षाव केल्याचे यानिमित्तानं दिसून आले आहे.

*कसा आहे ट्रेलर?

सोशल मीडियावर अक्षयच्या आगामी राम सेतूचा ट्रेलर आता व्हायरल झाला आहे. साधारण दोन मिनिटं आणि नऊ सेकंदाच्या त्या व्हिडिओनं चाहत्यांना जिंकून घेतलं आहे. बऱ्याच दिवसांनी अक्षय एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांसमोर आला आहे. राम सेतूचे व्हिएफएक्स, ग्राफीक्स आणि बॅकग्राउंड म्युझिक चाहत्यांना प्रचंड भावले आहे. त्यांनी अक्षयच्या दमदार परफॉर्मन्सचे कौतूकही केले आहे. ट्रेलरचा शेवटची सीन तर अंगावर काटा आणणारा आहे. अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे.

*राम सेतूच्या ट्रेलरवरुन मीम्सचा पाऊस

अक्षयच्या राम सेतूचा ट्रेलर व्हायरल होताच अनेकांनी त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स तयार केले आहेत. त्यावरुन त्याला ट्रोल केले आहे. गेल्या काही दिवसांपासून अक्षयला नेटकरी धारेवर धरताना दिसत आहे. त्याच्या रक्षाबंधन या चित्रपटावरुन देखील त्याच्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्या चित्रपटाची कथा ही एका पाकिस्तानी चित्रपटावरुन घेतल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. आता दिवाळीमध्ये त्याच्या राम सेतू या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT