Sakshi Chopra ramayan fame ramanand sagar great granddaughter sakshi chopra accused netflix makers for sexual harassment  Esakal
मनोरंजन

Sakshi Chopra: 'रामायण'कार रामानंद सागर यांच्या नातीने नेटफ्लिक्सवरील शोच्या निर्मात्यांवर लावले लैंगिक अत्याचाराचे आरोप...

Vaishali Patil

Ramanand sagar great granddaughter sakshi chopra accused netflix makers for sexual harassment: 90 च्या दशकात 'रामायण' सारख्या मालिकांची निर्मिती करून, रामानंद सागर यांनी प्रत्येक घरात भक्तीची अशी भावना निर्माण केली की आजही लोक ते विसरलेले नाहीत. नुकतच आदिपुरुष सिनेमामुळे पून्हा त्याची आठवण सर्वांनाच आली. मात्र ही बातमी त्यांच्याबद्दल नाही तर त्यांच्या नातीबद्दल आहे. रामानंद सागर यांची नात साक्षी चोप्रा अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते.

साक्षी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. ती तिच्या बोल्ड आउटफिट्समुळे तिचे व्हिडिओ देखील व्हायरल होत असते.

साक्षीने नुकतीच इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत मोठा खुलासा केला आहे. तिने पोस्ट शेअर करत सोशल करन्सीच्या निर्मात्यांवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. ज्याच्या सोबत तिने काम केले होते. याशिवाय फसवणूक आणि खोटे आश्वासन दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

इंस्टाग्राम पोस्टमध्ये, साक्षीने शोमध्ये तिच्यासोबत झालेल्या घटनांची माहिती दिली. तिने म्हटले आहे की शोच्या निर्मात्यांनी तिला लैंगिक कृत्ये करण्यास भाग पाडले. तिने स्पष्ट केले की शोच्या निर्मात्यांनी तिला गोव्यातील एका क्लबमध्ये अनोळखी व्यक्तींना तिच्यासोबत डान्स करायला लावणे, अश्लील टिप्पण्या द्यायला लावल्या, अनोळखी व्यक्तींना पाठ खाजवण्यास सांगायला लावले आणि बाहेर रस्त्यावर विचित्र आवाज काढायला लावला.

त्या पोस्टमध्ये तिने लिहिलं की, 'मी माझ्या ड्रेसच्या निवडीबाबत खुप धाडसी असल्याने, मला या घाणेरडेपणाचा त्रास होणार नाही, असे त्यांनी गृहीत धरले. मी माझ्या संगीताचा, कुटुंबाचा आणि शांतीचा आनंद घेते. मला माझ्या आयुष्यात एवढेच हवे आहे.

मला अगदी स्पष्ट होते की जर मला एखाद्या दिवशी फोन आला नाही तर मी आईच्या परवानगीशिवाय सही करणार नाही कारण मी माझ्या आईशिवाय जगू शकत नाही. म्हणून त्यानी या सर्व गोष्टींचे वचन दिले आणि मी त्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केले.'

यात तिने पुढे सांगितले की, 'मृदुल माझ्या ब्रेस्टबद्दल आणि माझ्या बॅकबद्दल बोलला, त्यांनी ते रेकॉर्ड केले. एक वर्ष त्यांनी मला सांगितले की हा फक्त एक गेम शो होता - काय? Netflix_in, Solproductions_fazila_sol showrunnerchad SanvariAlagNair आणि kamnamenezes ने त्याला माझ्यासोबत लॉक करून त्याच घरात राहण्याची परवानगी दिली. तिथे मला किती गुदमरत होता हे मी सांगू शकत नव्हते.

याच पोस्टमध्ये साक्षीने दावा केला की निर्मात्यांनी तिला तिच्या आईशी बोलण्यापासून रोखले. जेव्हा तिने लैंगिक अत्याचाराबद्दल सर्वांना सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रॉडक्शन टीमने तिचा फोन जप्त केला आणि तिच्या आईशी बोलू दिलं नाही.'

तिची पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. तिने या पोस्टमध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. हा शो सध्या नेटफ्लिक्स इंडियावर प्रसारित होत आहे आणि त्यात स्पर्धक पार्थ समथान, मृदुल मधोक आणि रुही सिंग आहेत.

मात्र साक्षीच्या या पोस्टनंतर शोच्या निर्मात्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यासोबतच साक्षीचे चाहते तिला सतत पाठिंबा देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT