Ramayan Fame Arun Govil and Dipika Chikhlia together on small screen in this show. Google
मनोरंजन

TV News: अनेक वर्षांनी टी.व्ही वर पुन्हा राम आणि सीता, अरुण गोविल-दीपिका चिखलियाची रंगली चर्चा

टीव्हीचे राम अरुण गोविल आणि सीता मय्या दीपिका चिखलिया यांचा एका शो मधील प्रोमो सध्या भलताच व्हायरल होताना दिसत आहे.

प्रणाली मोरे

TV News Update: रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेची एकेकाळी मोठी क्रेझ चाहत्यांना होती. आता देखील लोक टीव्हीचे राम अरुण गोविल आणि सीता मय्या दीपिका चिखलिया यांच्यावर भरभरुन प्रेम करतात,आदर करतात इतकंच काय कुठे दिसले तर त्यांची पूजा देखील सुरु करतात. आता हे प्रेक्षकांचे त्यांच्यावरील प्रेमच आहे ज्यामुळे रामायण मालिकेतील राम-सीता पुन्हा आपल्याला लवकरच एकत्र दिसणार आहेत. अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया लवकरच 'झलक दिखला जा १०' च्या मंचावर येणार आहेत. या भागाचा प्रोमो सध्या भलताच व्हायरल होत आहे.(Ramayan Fame Arun Govil and Dipika Chikhlia together on small screen in this show.)

राम आणि सीताची भूमिका साकारणारे अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांना प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं. अरुण गोविल आणि दीपिका यांनी टी.व्हीवर राम-सीताच्या व्यक्तीरेखा इतक्या सुरेख साकारल्या होत्या की लोक आजही त्यांना देवच मानतात. रामायणातील दोघांची केमिस्ट्री लोकांना भलतीच भावली होती. आता पुन्हा हे दोन्ही कलाकार छोट्या पडद्यावर दस्तक देणार आहेत. अरुण गोविल-दीपिका हे दोघं एकत्र 'झलक दिखला जा १०' च्या मंचावर एकत्र स्टेजवर दिसणार आहेत.

झलक दिखला जा १० चा हा प्रोमो सोशल मीडियावर जेव्हापासून शेअर करण्यात आला आहे तेव्हापासून भलताच व्हायरल झाला आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर दीपिका आणि अरुण गोविल डान्स रिअॅलिटी शो मध्ये गेस्ट म्हणून हजर राहणार आहेत. 'झलक दिखला जा' मध्ये अरुण गोविल रावणाचा वध करताना देखील दिसणार आहेत. प्रोमोमध्ये रामायणातील हे दोन्ही कलाकार आपल्या मालिकेतील रावण वधाच्या सीनला पुन्हा साकारताना दिसतील.

प्रोमोमध्ये दीपिका,अरुण गोविल यांच्यासोबत उभ्या आहेत आणि म्हणत आहेत,''माझं आयुष्य तेव्हाच अर्थपूर्ण होईल जेव्हा घराघरात तुमचा आदर केला जाईल''. त्यानंतर अरुण गोविल धनुष्यबाण सोडतात आणि रावणाचा वध करताना दिसतात. खूप वर्षानंतर पुन्हा रामायणातील राम आणि सीता यांना पाहून त्यांचे चाहते मात्र भलतेच खूश झालेयत. 'झलक दिखला जा' च्या या प्रोमोनं लोकांची कैक वर्षापूर्वीची आठवण ताजी केली आहे.

लेटेस्ट प्रोमोमध्ये अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांच्या समोर निया शर्मा काली मां च्या रुपात दमदार परफॉर्मन्स करताना दिसणार आहे. नियाचा डान्स दीपिका चिखलिया यांना खूपच भावलेला प्रोमोत दिसून येत आहे. निया संदर्भात बोलताना त्या म्हणतात की, ''मला वाटलं माझ्यासमोर साक्षात मां कालीला मी पाहत आहे''. 'झलक दिखला जा' च्या या प्रोमोनेच खूप पसंती मिळवली आहे,आता लोकांना राम-सीतेला प्रत्यक्षात रावण वध करताना छोट्या पडद्यावर अनुभवायचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT