ramayana 
मनोरंजन

'रामायणा'तील 'रावणा'च्या निधनाची अफवा; 'लक्ष्मणा'ने लिहिली पोस्ट

अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाचं वृत्त सुनील लहरींनी फेटाळून लावलं.

स्वाती वेमूल

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी आपले प्राण गमावले. अशातच लोकप्रिय मालिका 'रामायण'मध्ये Ramayan रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी Arvind Trivedi यांच्यासुद्धा निधनाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. अरविंद यांचं कोरोनाने निधन झाल्याची अफवा सर्वत्र पसरली असतानाच आता मालिकेतील त्यांचे सहकलाकार सुनील लहरी Sunil Lahri यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. रामायणात लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सुनील लहरी यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित अरविंद यांच्या निधनाचं वृत्त खोटं असल्याचं स्पष्ट केलं आहे. (ramayan ravan fame arvind trivedi death rumours laxman aka sunil lahiri clarifies)

सुनील लहरी यांची पोस्ट

अभिनेते सुनील यांनी अरविंद यांचा रावणातील भूमिकेतला एक फोटो पोस्ट केला आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये सुनील आणि अरविंद एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करत सुनील यांनी लिहिलं, 'कोरोनामुळे आजकाल सतत वाईट बातम्या ऐकायला मिळत आहेत. त्यातच अरविंद त्रिवेदी यांच्याबद्दल खोटी बातमी पसरविणाऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी अफवा पसरवू नये. देवाच्या कृपेने अरविंदजी ठीक आहेत आणि देव त्यांना नेहमी निरोगी ठेवो ही प्रार्थना करतो.'

हेही वाचा : 'छिछोरे'मधील अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचे कोरोनाने निधन

सोशल मीडियावर पोस्ट लिहित सुनील यांनी अरविंद यांच्या निधनाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांच्या या पोस्टवर रामायणात सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनीसुद्धा हात जोडलेले इमोजी पोस्ट करत त्यांचे आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपने राष्ट्रीय पातळीवर केली नियुक्ती, सोपवण्यात आली महत्त्वाची जबाबदारी

Fifa World Cup विजेत्या देशाचा क्रिकेटच्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाच्या महासत्तेला धक्का; स्पेनचा २१-० हा विक्रम नेमका आहे तरी काय?

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Marathi News Live Updates : वाराणसी विमानतळावर विमानातील प्रवाशाकडे आढळले शस्त्र

घरी नणंदेसोबत कशी वागते करीना कपूर? सैफ अली खानच्या बहिणीने सांगितली आतली गोष्ट; म्हणाली- ती नाटकी...

SCROLL FOR NEXT