ramayan serial bharat fame sanjay jog son ranjeet jog second wedding with pranali  SAKAL
मनोरंजन

Ranjeet Jog Wedding: सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, वडीलांनी रामायण मालिकेत केलंय काम

रणजितने गुपचुप दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे

Devendra Jadhav

Ranjeet Jog Wedding News: तुम्हाला रामायण मालिकेतील भरत ची भुमिका साकारणारे अभिनेते संजय जोग ठाऊक असतील. मराठमोळे अभिनेते संजय जोग यांनी रामायण मालिकेत साकारलेली भुमिका अजरामर झाली. संजय जोग यांचा मुलगा रणजित जोग हा सुद्धा मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. रणजितने गुपचुप दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. रणजितने प्रणाली धुमाळ सोबत मोजक्याच मित्रमंडळींसमवेत हे लग्न केले.

(ramayan serial fame sanjay jog son ranjeet jog second wedding with pranali dhumal)

२०१३ साली रणजितने संयुक्ता सोबत पहिले लग्न केले होते. मात्र लग्नानंतर काही वर्षातच काही व्यक्तिगत कारणामुळे त्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री प्रणाली धुमाळ सोबत रणजितचे हे दुसरे लग्न आहे.

रणजित च्या लग्नाची बातमी समजताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रणजित जोगचे कुटुंब चार पिढ्यांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. रणजितचे वडील संजय जोग हे मराठी हिंदी सृष्टीत अभिनेते म्हणून काम करत होते. नाना जोग हे रणजितचे पणजोबा हे मराठी सृष्टीतील मोठे प्रस्थ म्हणून ओळखले जात. संजय जोग यांनी १९९५ साली किडनी विकाराने या जगाचा निरोप घेतलेला आहे. रणजितची आई नीता जोग या पेशाने वकील आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minister Jaykumar Gore: युती होणार, कोणीच रोखू शकत नाही; पालकमंत्री जयकुमार गोरे, युती रखडली का? यावर काय म्हणाले?

Horrible Accident: मदतीसाठी किंकाळ्या, पण दार उघडलेच नाही… 17 जीव आगीत होरपळले, भीषण बस दुर्घटना!

Kashmiri Pheran: लोकल ते ग्लोबल ओळख बनलेला काश्मिरी फेरन, वाचा कसा बनतो आणि काय आहे त्याची खासियत

Tigress Tara: कसणी परिसरात तारा वाघिणीचा फेरफटका; कॉलर रेडिओद्वारे देखरेख, एसटीसमोरूनच रस्ता ओलांडत हाेती अन्..

अयोध्येची राजकुमारी 2 हजार वर्षांपूर्वी कोरियाला गेली, तिथल्या राजाशी लग्न केलं; अयोध्येत भव्य पुतळ्याचं अनावरण

SCROLL FOR NEXT