ramayan serial ram sita laxman actor in ayodhya for pran pratishtha Sakal
मनोरंजन

Ayodhya Ram Mandir : "किती बदलली अयोध्या ?" रामायणमधील राम, सीता, लक्ष्मण पोहचले रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी

रामायण मालिकेत रामाची भूमिका करणारे अरुण गोविल, सीता झालेल्या दीपिका चिखलिया आणि लक्ष्मणाचे काम करणारे सुनील लाहिरी हे रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सध्या अयोध्येत पोहचले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

अयोध्या : रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका नव्वदच्या दशकात घराघरांत भक्तिभावाने पाहिली जात होती. या मालिकेत रामाची भूमिका करणारे अरुण गोविल, सीता झालेल्या दीपिका चिखलिया आणि लक्ष्मणाचे काम करणारे सुनील लाहिरी हे रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सध्या अयोध्येत पोहचले आहेत.

अयोध्येत पोहोचल्यानंतरचे त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात दीपिका यांनी लाल रंगाची साडी तर अरुण गोविल आणि लाहिरी यांनी पिवळ्या रंगाचे कुर्ते परिधान केले आहेत.

एका हिंदी वाहिनीशी बोलताना लाहिरी म्हणाले की, अयोध्येच्या या रूपावर विश्‍वास बसत नाही. दोन वर्षांपूर्वी येथे मी चित्रीकरणासाठी आलो होतो. खूप काही बदल झाला आहे. येथील हवेतून आपल्याला एक ऊर्जा मिळते. अयोध्येतील रस्त्यांच्या कडेला असलेली दुकाने आणि घरांतून भक्तीचे वातावरण दिसत आहे. शहर खूप स्वच्छ झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: हॅरी ब्रुक - जो रुटची शतकं, पण सिराज-प्रसिद्धचा तिखट मारा; शेवटचा दिवस निर्णायक; जाणून घ्या समीकरण

ENG vs IND, 5th Test: भारताविरुद्ध शतक केल्यानंतर जो रुटने डोक्याला बँड बांधून का केला आकाशाकडे इशारा? पाहा Video

दिल्लीत मोठ्या घडामोडी, PM मोदींनंतर गृहमंत्री शहांनी घेतली राष्ट्रपतींची भेट; एकाच दिवशी भेटीचं कारण काय?

Shambhuraj Desai: गृहप्रवेशावेळी शंभुराज देसाईंना अश्रू अनावर; ‘मेघदूत’ बंगल्यावर बालपणीच्या आठवणींना उजाळा

Raigad Fort Conservation: 'रायगड संवर्धनाला येणार वेग'; संभाजीराजे यांची केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांशी चर्चा

SCROLL FOR NEXT