मनोरंजन

रामायणात निषाद राजची भूमिका करणारे अभिनेते कालवश

टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे रामायणात प्रभु श्रीरामचंद्र यांचे घनिष्ठ सहकारी म्हणून रामायण मालिकेत भूमिका करणारे चंद्रकांत पंड्या यांचे निधन झाले आहे. त्यांनी रामायणामध्ये निषाद राज यांची भूमिका साकारली होती. त्यांच्या जाण्यानं टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वी रामायण मालिकेत रावणाची भूमिका साकारणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांचे निधन झाले होते.

पंड्या यांच्या निधनाची माहिती रामायण मालिकेमध्ये सीतेची भूमिका करणाऱ्या दीपिका चिखलिया यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. काही दिवसांपूर्वी रामायण मालिकेमध्ये रावणाची भूमिका साकारणाऱ्या त्रिवेदी यांच्या जाण्यानं चाहत्यांना धक्का बसला होता. आता निषाद राज यांच्या जाण्यानं चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. चंद्रकांत पंड्या यांना चाहते बबला या नावानं ओळखत होते. त्यांचा जन्म 1946 साली गुजरात राज्यातील बनासकाठा जिल्ह्यातील भीलडी गावात झाला होता. त्यांचे वडील व्यापारी होते. ते गुजरातमधून मुंबईला व्यापारासाठी आले. तिथे त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. आणि ते मोठे उद्योगपती झाले. चंद्रकांत यांचे शिक्षण मुंबईत झाले.

पंड्या यांनी रामायणाशिवाय काही चित्रपटांमध्येही काम केलं होतं. याशिवाय त्यांनी टीव्ही मालिकांमध्येही काम केलं. त्यांचा चाहतावर्ग मोठा होता. त्यांच्या अभिनयामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळाली. चंद्रकांत यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यांनी नाटकांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांची ओळख अरविंद त्रिवेदी आणि उपेंद्र त्रिवेदी यांच्याशी झाली. त्यामुळे त्यांना मोठं व्यासपीठ मिळालं. कडू मकरानी या गुजराती चित्रपटातून पंड्या यांना ब्रेक मिळाला होता. मात्र त्यांना ओळख मिळाली ती रामायणातील निषाद राजची भूमिका साकारल्यानंतरच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Open or Closed Update: अनंत चतुर्थीला महाराष्ट्रात बँका सुरू की बंद? RBI कडून मोठी अपडेट

Nandigram By-Election Symbol Controversy : निवडणूक आयोगाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर; 183 चिन्हं असताना 'लिफाफा' वरच वाद का? हायकोर्टानं कोणाला सुनावलं?

Thane Water Supply: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! २४ तास पाणीकपात, कोणत्या भागांना फटका?

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Rare Otters in Sangli : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! कृष्णा नदीपात्रात पहिल्यांदाच आढळला दुर्मिळ पाणमांजरांचा कळप; 8 ते 9 पाणमांजरं दिसली एकत्र

SCROLL FOR NEXT