Ram charan-upasana Good News esakal
मनोरंजन

Ram charan-upasana Good News : रामचरणची गोड बातमी, पण त्याचं जपानशी काय आहे कनेक्शन?

टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रामचरण हा नेहमीच त्याच्या चाहत्यांमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतो.

युगंधर ताजणे

Ramcharan Upasana Kamineni good news actor share japan RRR : टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रामचरण हा नेहमीच त्याच्या चाहत्यांमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतो. आजच्या घडीला साऊथ चित्रपट विश्वात सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या सेलिब्रेटींच्या यादीत त्याचे नाव घ्यावे लागेल. रामचरणची प्रमुख भूमिका असलेला RRR नावाचा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता. त्याला मानाचा ऑस्करही मिळाला.

आता रामचरण एका खास कारणासाठी चर्चेत आहे. सोशल मीडियावरही तो ट्रेंड करतो आहे. त्याचे कारण त्यानं दिलेली गोड बातमी. येत्या काही दिवसांत आपल्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याची बातमी रामचरणनं दिली आणि त्यानंतर त्याच्यावर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केला. तो सध्या G20 च्या टुरिझम वर्किंग ग्रुपच्या मीटिंगसाठी कश्मिरला गेला आहे. दरम्यान त्यानं दिलेली आणखी एक प्रतिक्रिया भलतीच चर्चेत आली आहे.

Also Read - Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!

कश्मिर मधील एका इव्हेंटमध्ये रामचरणनं आपली गोड बातमी विषयी सांगत ही जादू जपानमध्ये घडल्याचे मिश्किलपणे सांगितले. त्यावेळी उपस्थित लोकांनी त्याला हसून दाद दिली. रामचरणचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्याला मिळालेला प्रतिसादही मोठा असून त्यावर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही गंमतीशीर आहे.

त्याचं झालं असं की,रामचरण हा त्याच्या पत्नीसमवेत आऱआऱआरच्या प्रमोशनसाठी जपानला गेला होता. त्यावेळी आपल्या आयुष्यात एक जादू घडली. असे रामचरणनं म्हटले आहे.

माझी पत्नी ही गरोदर असून आता तिला सातवा महिना सुरु आहे. आम्ही सगळेजण खूप आनंदात आहोत. राम आणि त्याची पत्नी उपासना हे त्यांच्या टीमसोबत जपानच्या दौऱ्यावर होते. जपानमध्ये देखील RRR ला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले.

या चित्रपटाचे खूप कौतूकही केले. या चित्रपटानं दोनशे दिवसांमध्ये १५० मिलियन डॉलरची कमाई केल्याचे दिसून आले आहे. नाटू नाटूला ऑस्कर मिळण्यापूर्वी जपानमध्ये त्या गाण्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. अशी प्रतिक्रिया रामचरणनं दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivdeep Lande contest Bihar Election: ‘सिंघम’ शिवदीप लांडे यांचीही आता बिहारच्या निवडणूक रिंगणात उडी; उमेदवारी अर्ज दाखल करणार!

EPFO New Option : 'ईपीएफओ' सदस्यांना मिळाला नवा पर्याय! आता 'PF' रक्कम पेन्शन खात्यात वळवता येणार

ब्रेकिंग! साहेबांच्या नावाने लाच मागणारा एजंट ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; मयताच्या भावाकडे, पत्नीकडे पीएफ, पेन्शन काढून देण्यासाठी मागितले २५००० रुपये

Ajit Pawar : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

Supreme Court : मृत्युदंडाच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्रावर नाराजी

SCROLL FOR NEXT