Ranbir Alia esakal
मनोरंजन

'पुढच्यावेळी ते काहीही करु शकतात', 'त्या' व्हायरल फोटो प्रकरणी Alia-Ranbirची पापाराझींवर कायदेशीर कारवाई...

सकाळ डिजिटल टीम

काही दिवसांपुर्वी आलिया भट्टच्या घरातील तिचे काही खासगी फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. आलिया तिच्या लिव्हिंग रुममध्ये आराम करत असताना दोन पापाराझींनी फोटो काढून सोशल मीडियावर टाकले. जेव्हा आलियाला याची माहिती मिळाली तेव्हा तिला हे पाहून धक्का बसला.

यानंतर बराच वाद झाला केवळ आलियाच नव्हे तर इतर बॉलिवुड कलातकारांनीही आलियाला पाठिंबा देत या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली होती. आलिया भट्टनंतर, गोपनीयतेच्या मुद्द्यावर अनेक बॉलिवूड कलाकारांनी तिला पाठिंबा दिला होता त्यात करण जोहर, अर्जुन कपूर, अनुष्का शर्मापासून ते स्वरा भास्करपर्यंत, बॉलीवूड स्टार यांनी गोपनीयतेच्या बाबतीत पापाराझींना मर्यादेत ठेवण्याबद्दल बोलले आणि या घटनेवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. यानंतर तिने मुंबई पोलिसांना यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

Alia bhatt

आलियाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक मोठी नोट लिहून या घटनेचा उल्लेख केला होता. आता रणबीर कपूर पत्नी आलियाच्या गोपनीयतेप्रकरणी कायदेशीर कारवाई करणार आहे. रणबीर कपूरने सांगितले की, ही घटना अत्यंत लाजिरवाणी आहे आणि सध्या या संपूर्ण प्रकरणात कायदेशीर कारवाई करत आहे.

रणबीर कपूरने नुकतच मुलाखतीत सांगितले की, 'ही घटना खूप वाईट होती. हे एखाद्याच्या गोपनीयतेचे उल्लंघन आहे. तूम्ही माझ्या घरात शूट करू शकत नाहीस. माझ्या घरात काहीही होऊ शकते. ते माझं घर आहे. हे पूर्णपणे चुकीचे होते. आम्ही या संपूर्ण प्रकरणावर योग्य कायदेशीर मार्गाने कारवाई करत आहोत', तथापि रणबीरने याबद्दल जास्त बोलण्यास नकार दिला आणि सांगितले की जे काही झाले ते अत्यंत खाणेरडे आहे.

रणबीर पुढे म्हणाला, 'आम्ही पापाराझींचा आदर करतो. मला वाटतं की पापाराझी हा आपल्या जगाचा एक भाग आहे. ते आमच्यासाठी काम करतात आणि आम्ही त्यांच्यासाठी काम करतो' पण अशा गोष्टी करणं खूप लज्जास्पद आहे.'

आलिया भट्टने इन्स्टा स्टोरीमधील आपला एक फोटो शेअर केला आहे, जो पापाराझीनी चोरुन काढला. ज्यामध्ये ती तिच्या लिव्हिंग रुमध्ये आराम करताना दिसते. या फोटोसोबत अभिनेत्रीने लिहिले की, नेहमीप्रमाणे मी दुपारी माझ्या घरी लिव्हिंग रुममध्ये विश्रांती घेत होते... तेवढ्यात मला असं वाटलं की कोणीतरी मला बघतंय. मी वर पाहिलं तर शेजारच्या इमारतीच्या छतावर कॅमेरे घेऊन दोन लोक दिसले, 'हा विनोद आहे का? एखाद्याचे असे फोटो घेणे कितपत शोभतं? असा सवाल आलियाने केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT