Animal Release Date: Esakal
मनोरंजन

Animal Release Date: रणबीरच्या 'अ‍ॅनिमल'चं उत्सुकता वाढवणारं जबरदस्त पोस्टर भेटीला! 'या' दिवशी चित्रपट होणार रिलीज!

Vaishali Patil

Animal Release Date: गेल्या अनेक दिवसांपासून रणबीरच्या बहूप्रतिक्षित चित्रपट 'अ‍ॅनिमल' ची खुपच चर्चा होती. ब्रम्हास्त्रनंतर तो पुन्हा मोठ्या चित्रपटासह तो एंट्री करणार असल्यानं या सिनेमासाठी त्याचे चाहते उत्सूक आहे. तू झुठी मै मक्कार सिनेमांनंतर तो आता एका रफ अ‍ॅण्ड टफ लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या अ‍ॅनिमलचा प्री टीझर काही महिन्यापुर्वी रिलिज करण्यात आला होता. मात्र या चित्रपटाच्या रिलिज डेटबद्दल बराच गोंधळ होता. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी अनेकवेळा या सिनेमाची रिलिज डेट पुढे सरकवली आहे. त्यामुळे रणबीरचे चाहते खुपच उत्साहित होते अशातच आता बहुप्रतिक्षित 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाबाबत निर्मात्यांनी मोठी अपडेट दिली आहे.

अखेर चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाची रिलीज डेट सांगितली आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचे एक पोस्टर देखील रिलिज केले आहे.

अभिनेता रणबीर कपूर आणि लेखक-दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांचा हा सिनेमा या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच 1 डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

तर 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाचा टीझर 28 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापुर्वी निर्मात्यांनी 'अ‍ॅनिमल' चा एक प्री-टीझर रिलीज केला होता ज्यात रणबीर एक खतरनाक लूकमध्ये दिसत होता.

हा चित्रपट ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ज्यात हिंदी व्यतिरिक्त तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि तामिळ भाषेचा सामावेश आहे. या सिनेमॅटिक मास्टरपीसमध्ये रणबीरसोबत अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी प्रमुख भूमिकेत आहेत.

भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांच्या टी-सिरीज, मुराद खेतानी यांचा सिने1 स्टुडिओ आणि प्रणय रेड्डी वंगा यांच्या भद्रकाली पिक्चर्स यांनी अॅनिमल'ची निर्मिती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle Class: 5 मिनिटांत बँक बॅलन्स 43,000 रुपयांवरून 7 रुपयांवर आला; भाड्यापासून ते EMIपर्यंत.. मध्यमवर्ग आर्थिक संकटात

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

Supreme Court: सरकारी बंगला रिकामा करून ताब्यात घ्या; माजी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाबाबत न्यायालयाचे पत्र

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT