Ranbir Kapoor Animal Movie Actor Trolled esakal
मनोरंजन

Ranbir Kapoor Trolled : राजामौलींच्या पाया पडला ट्रोल झाला, काय आहे कारण? नेटकऱ्यांनी काढला जाळ

संदीप रेड्डी वांगाच्या अर्जून रेड्डी आणि कबीर सिंगचे प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात कौतुक केले होते.

युगंधर ताजणे

Ranbir Kapoor Animal Movie Actor Trolled : संदीप रेड्डी वांगाच्या अर्जून रेड्डी आणि कबीर सिंगचे प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात कौतुक केले होते. त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चाही झाली होती. या सगळ्यात आता त्याचा अॅनिमल प्रेक्षकांपुढे येतो आहे. एक डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या सगळ्यात रणबीर कपूर एका पोस्टमुळे चर्चेत आला आहे.

रणबीर कपूर हा एस एस राजामौली यांच्या पाया पडतानाचा तो फोटो असून त्यामुळे नेटकऱ्यांनी रणबीरला ट्रोल केले आहे. त्यावेळी आलेल्या प्रतिक्रियांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यापूर्वी देखील अॅनिमलवरुन वेगवेगळ्या प्रकारचे वाद समोर आले आहे. एका कोरियन मुव्हीमधील सीनची कॉपी या चित्रपटामध्ये केल्याची चर्चा आहे. दुसरीकडे अक्षय कुमार अमिताभ बच्चनच्या जानवर चित्रपटातील सीनवरुन वेगळ्याच वादाला सुरुवात झाली आहे.

Life Balance जाणून घ्या हा 'वेक अप काॅल' आणि बना सर्वार्थाने समृद्ध

अॅनिमलचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि रणबीरवर प्रेक्षकांनी, नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्याच्या अभिनयाला दाद मिळत आहे. काही झालं तरी हा चित्रपट येत्या काळात बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करणार असल्याचे संकेत त्याच्या अॅडव्हान्स बुकींगनं दिले आहेत. त्यात एका फोटोमुळे मात्र वेगळ्याच वादाला सुरुवात झाली आहे. तो फोटो आहे रणवीर आणि राजामौली यांचा.

सध्या तरी अॅनिमलचे जोरदार प्रमोशन सुरु झाले आहे. साऊथमध्ये देखील त्याविषयी चर्चेला उधाण आले आहे. अशातच अॅनिमलच्या प्रमोशनला आरआरआऱचे दिग्दर्शक राजामौली आणि प्रसिद्ध अभिनेता महेश बाबू हे उपस्थित होते. यावेळी रणबीरचा राजामौली यांच्या पाया पडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याची चर्चा होताना दिसत आहे. तसे करणे त्याला महागात पडले आहे. तो हे सगळे त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी करत असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT