Mahesh Bhatt reviews Ranbir Kapoor’s performance in Animal  esakal
मनोरंजन

Mahesh Bhatt Reaction : 'आमच्या जावईबापूंचा नाद करायचा नाय'! अ‍ॅनिमल पाहिल्यावर सासरेबुवा झाले भलतेच खूश

महेश भट्ट यांच्यापूर्वी आलियानं जेव्हा अॅनिमल पाहिला होता तेव्हा तिनं देखील रणबीरची तोंड भरुन स्तुती केली होती.

युगंधर ताजणे

Mahesh Bhatt reviews Ranbir Kapoor’s performance in Animal : कुणी कितीही रणबीरवर टीका केली तरी त्यानं आपण किती गुणी कलाकार आहोत हे अॅनिमलच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. आतापर्यत या चित्रपटानं सातशे कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याचे दिसून आले आहे. केवळ भारतच नाही तर जगभरातील प्रेक्षकांनी अॅनिमलचं कौतुक केलं आहे.

या सगळ्यात रणबीर कपूरवर चाहते, प्रेक्षक यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव वाट्याला येत आहे. कित्येक नेटकऱ्यांनी भलेही त्याच्यावर टीका केली असली तरी दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगानं ज्या प्रकारे रणबीरला पडद्यावर आणलं आहे ते कमाल आहे. अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. त्यात आता चक्क रणबीरचे सासरेबुवा महेश भट्ट यांनी देखील रणबीरचं कौतुक केलं आहे.

महेश भट्ट यांच्यापूर्वी आलियानं जेव्हा अॅनिमल पाहिला होता तेव्हा तिनं देखील रणबीरची तोंड भरुन स्तुती केली होती. त्याच्यासाठी खास इंस्टावर पोस्ट देखील शेयर केली होती. अॅनिमल हा रणबीरचा आजवरचा सर्वाधिक यशस्वी चित्रपट म्हणता येईल. या चित्रपटानं रणबीरला वेगळी ओळख मिळवून दिल्याचे अनेक समीक्षक, अभ्यासक यांचे म्हणणे आहे. रणबीरच्या आतापर्यतचा सर्वाधिक बेस्ट परफॉर्मन्स म्हणून अनेकजण या चित्रपटाचा दाखला देतात.

महेश भट्ट यांनी आपल्या जावयासारखे अन्य कुणी नाही. अशा शब्दांत रणबीरची पाठ थोपटली आहे. रणबीरच्या अॅक्टिंगनं अॅनिमलला वेगळ्याच उंचीवर नेले. त्यामुळे तो चित्रपट हिट झाला. त्याचा परफॉर्मन्स खरोखरच कौतुकास्पद म्हणावा लागेल. त्यानं ज्याप्रकारे काम केले त्यामुळे चित्रपट वेगळ्याच उंचीवर गेला आहे.

रणबीर सोबतच महेश भट्ट यांनी दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाचे देखील कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, संदीपनं खूपच धाडसी दिग्दर्शन केले आहे. रणबीरनं जो पावरपॅक परफॉर्मन्स दिला आहे त्याचे श्रेय दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाला जाते. रणबीर हा अॅनिमलचे प्रमोशन करण्यासाठी इंडियन आयडॉलमध्ये आला होता. तेव्हा त्याला महेश भट्ट यांचा तो व्हिडिओ दाखवण्यात आला.

यावेळी महेश भट्ट यांनी त्या व्हिडिओमधून रणबीरच्या अभिनयाचे देखील कौतुक केले. ते म्हणाले, रणबीर एक उत्तम अभिनेता आहे यात कुठलीही शंका नाही. मात्र या बरोबरच तो एक सर्वोत्तम बाप देखील आहे. तो ज्यावेळी त्याच्या लेकीसोबत असतो तेव्हा त्याच्या डोळ्यातील चमक पाहण्यासारखी असते. असेही महेश यांनी म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT