ranbir kapoor animal movie specia ticket offer just rs 100 rs sandeep reddy vanga  SAKAL
मनोरंजन

Animal Movie Offer: 'अ‍ॅनिमल'च्या मेकर्सची मोठी ऑफर! आता सिनेमाचा आनंद घ्या फक्त 'इतक्या' रुपयांमध्ये

'अ‍ॅनिमल' च्या मेकर्सनी प्रेक्षकांसाठी मोठी ऑफर आणली आहे

Devendra Jadhav

Animal Movie Offer: 'अ‍ॅनिमल' सिनेमाने बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केली. रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' त्याच्या हटके कथानकामुळे आणि सुपरहिट गाण्यांनी चांगलाच गाजला. 'अ‍ॅनिमल' पाहण्यासाठी चाहत्यांनी हाऊसफुल्ल गर्दी केली.

अशातच 'अ‍ॅनिमल' च्या निर्मात्यांनी प्रेक्षकांसाठी खास ऑफर दिली आहे. त्यामुळे सिनेमाच्या कमाईत चांगली वाढ होण्याची शक्यता आहे.

'अ‍ॅनिमल'च्या निर्मात्यांची खास ऑफर

थिएटरमध्ये गाजणारा 'अ‍ॅनिमल' पाहण्यासाठी निर्मात्यांनी प्रेक्षकांना विशेष ऑफर दिली आहे. या ऑफर अंतर्गत आता महागड्या दरात मिळणारे 'अ‍ॅनिमल'चे तिकीट केवळ 100 रुपयांमध्ये मिळू शकते.

याबद्दल माहिती देताना, X वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये एक लिंक देखील शेअर केली आहे, ज्याद्वारे दर्शक कमी किमतीत चित्रपटाची तिकिटे बुक करू शकतात.

'अ‍ॅनिमल'च्या निर्मात्यांनी रणबीर कपूरचा चित्रपट फक्त 100 रुपयांमध्ये पाहण्यासाठी दिली आहे. ही सविस्तर ऑफर येथे वाचा.

अलीकडेच, अॅनिमलच्या यशानंतर निर्मात्यांनी मुंबईत एक भव्य पार्टी आयोजित केली. यात चित्रपट कलाकारांशिवाय इंडस्ट्रीतील अनेक बड्या व्यक्ती दिसल्या होत्या. सोशल मीडियावर या कार्यक्रमाशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओही समोर आले आहेत.

या पार्टीत रणबीर कपूर, तृप्ती डिमरी, रश्मीका मंदाना, बॉबी देओल, अनिल कपूर शिवाय आलिया भट, नीतू कपूर आणि इतर कलाकार उपस्थित होते.

अॅनिमलच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट अजूनही चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने 39 व्या दिवशी 35 लाख रुपयांची कमाई केली. यासह चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 550.85 कोटींवर पोहोचले आहे.

2023 चा हा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट आहे. पहिल्या क्रमांकावर शाहरुख खानचा जवान आहे, जवानने तिकीट खिडकीवर 640.25 कोटी रुपये कमवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मराठी कलाकारांची ठाकरेंच्या मेळाव्याला मोठी हजेरी – कोण कोण आले आहे?

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT