Ranbir Kapoor Animal Movie esakal
मनोरंजन

Ranbir Kapoor Animal Movie : 'अ‍ॅनिमल' मध्ये चमकला प्रसिद्ध मराठी अभिनेता, अजय- अतुलचंही होतंय कौतुक! काय आहे कारण

अॅनिमलमध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पाहुण्या कलाकाराची भूमिका प्रेक्षकांच्या कौतुकाचा विषय आहे.

युगंधर ताजणे

Ranbir Kapoor Animal Movie : रणबीरच्या अॅनिमलचं प्रेक्षकांनी, चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर कौतुक केलं आहे. त्या चित्रपटाला प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. संदीप रेड्डी वांगानं दिग्दर्शित केलेला हा चित्रपट सध्याच्या घडीला बॉलीवूडमधील ट्रेडिंग टॉपिक आहे. गेल्या काही दिवसांपासून रणबीर यामुळे लाईमलाईटमध्ये आला आहे.

अॅनिमलच्या प्रीमिअरला जे बॉलीवूडचे सेलिब्रेटी हजर होते त्यात प्रसिद्ध अभिनेत्री आलियाची उपस्थिती लक्ष वेधून घेणारी होती. तिनं रणबीरच्या या चित्रपटाचे कौतुक करुन त्या कलाकृतीला दाद दिली आहे. खतरनाक अशा शब्दांत तिनं रणबीरच्या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे. रश्मिका मंदाना, बॉबी देओल, अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता होती.

राजस्थान निवडणुकीत महिला, सिलेंडर आणि जातीय मुद्दा.! (Rajasthan Assembly Election 2023 )

अॅनिमलमध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पाहुण्या कलाकाराची भूमिका खूप काही सांगून जाणारी आहे. यापूर्वी शाहरुख खानच्या जवानमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री गिरीजा ओकची महत्वाची भूमिका होती. तसेच रजनीकांत यांच्या जेलरमध्ये अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्या भूमिकेनं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर आता अॅनिमलची चर्चा सुरु झाली आहे.

बऱ्याच दिवसांपासून रेड्डी वांगाच्या अॅनिमल विषयी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला असून तो प्रेक्षकांना भावल्याचे दिसून येत आहे. यात प्रसिद्ध मराठी अभिनेते उपेंद्र लिमये यांच्या भूमिकेचं कौतुक होत आहे. त्यांनी या चित्रपटामध्ये एका आर्मी ऑफिसरची भूमिका केली आहे.

दुसरीकडे प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुलचंही चित्रपटात मोठं स्थान आहे. त्यांचे खास आभार मानले आहेत. अजय अतुलचं डॉल्बीवाल्या बोलव माझ्या डीजेला हे गाणं ऐकु येतं. एका फाईट सिक्वेन्समध्ये हे गाणं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसते. त्याची चर्चाही आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काय सांगता? यंदाच्या मान्सूनमध्ये चक्क 'ब्लॅक कार्बन'? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर...

IND vs ENG, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं अखेर पदार्पण झालं, पण कोणाला मिळाला संघातून डच्चू? पाहा भारत-इंग्लंडची Playing XI

NCP Sharad Pawar Merger Rumours: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरणाचे चर्चेला शशिकांत शिंदेंचा ठाम विरोध

Women Farmers Lead: भिवधानोरा गावातील शेतकरी महिलांची जलसंधारण, सेंद्रिय शेती व सामूहिक खरेदीत आदर्श कामगिरी; पाणी फाउंडेशन स्पर्धेत उठून दिसले योगदान

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT