ranbir kapoor animal runtime is more than 3 hours and censor give a certificate SAKAL
मनोरंजन

Animal: बापरे! रणबीरच्या सिनेमाची लांबी इतकी मोठी, सेन्सॉरकडून A सर्टिफिकेट

रणबीर कपूरच्या अ‍ॅनिमल सिनेमाबद्दल मोठी माहिती जाणून घ्या

Devendra Jadhav

Animal Ranbir Kapoor: रणबीर कपूरच्या अ‍ॅनिमल सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. गेल्या अनेक दिवसांपासुन सिनेमातली गाणी, टीझर अशा अनेक गोष्टींची सोशल मीडियावर हवा आहे. त्यातच आता अ‍ॅनिमलविषयी मोठी बातमी समोर आलीय. ती वाचुन तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

अ‍ॅनिमलचा रनटाईम समोर आलाय. गेल्या काही वर्षातले बॉलिवूड सिनेमे पाहिले तर अ‍ॅनिमल रनटाईम हा आजवरचा सगळ्यात जास्त लांबीचा सिनेमा म्हणता येईल.

अ‍ॅनिमल सिनेमाचा रनटाईम आणि सेन्सॉर सर्टिफिकेट

रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर यांची प्रमुख भुमिका असलेल्या अ‍ॅनिमल सिनेमाचा लांबी खुप मोठी आहे. तब्बल ३ तास २१ मिनीटं लांबीचा हा सिनेमा असणार आहे. त्यामुळे सध्याच्या फास्ट जमान्यात प्रेक्षकांच्या संयमाची परीक्षा होणार, यात शंका नाही.

याशिवाय सेन्सॉरकडून सिनेमाला A सर्टिफिकेट मिळालंय. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित हा सिनेमा रोमान्स आणि अ‍ॅक्शनचा मसाला असणार यात शंका नाही.

अ‍ॅनिमलचा खास टीझर बुर्ज खलिफावर

अ‍ॅनिमलच्या निर्मात्यांनी सिनेमाचा टीझर चित्रपटाच्या रिलीजपूर्वी संपूर्ण जगाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बुर्ज खलिफावरील अ‍ॅनिमलचा खास ट्रेलर दाखवला गेला. यावेळी रणबीर कपूरसोबत बॉबी देओल आणि निर्माते भूषण कुमार या ऐतिहासीक क्षणाचे साक्षीदार झाले.

या दिवशी अ‍ॅनिमल सिनेमा येणार भेटीला

भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांच्या टी-सिरीजची निर्मिती असलेला अ‍ॅनिमल सिनेमाची सध्या खुप चर्चा आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित हा चित्रपट क्राईम ड्रामा प्रकारातील आहे. सिनेमात रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदाना आणि बॉबी देओल अशा कलाकारांच्या प्रमुख भुमिका आहेत. हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 ला सिनेमागृहात रिलीज होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT