Ranbir Kapoor asked to make will before daughter raha's birth Google
मनोरंजन

Ranbir Kapoor ला मुलीच्या जन्माआधी वाटत होती मृत्यूची भीती..म्हणाला,'माझ्या सीएनं मला..'

रणबीर कपूरनं एका मुलाखतीत राहाच्या जन्माआधीचा एक किस्सा सांगत सगळ्यांना हैराण करून सोडलं.

प्रणाली मोरे

Ranbir Kapoor आता एका मुलीचा पिता आहे. नुकतंच त्यानं एका मुलाखतीत म्हटलं की राहामुळे घरातून बाहेर पडायचं मनच करत नाही. तिचं हसणं एकदम मॅजिकल आहे . रणबीरनं एका मुलाखतीत राहाच्या जन्माशी संबंधित एक इंट्रेस्टिंग गोष्ट सांगितली होती.

त्यानं सांगितलं होतं की, ''जेव्हा बायको आलिया प्रेग्नेंट होती तेव्हा माझ्या सीएनं मला इच्छापत्र करुन ठेवायला सांगितलं. मी तेव्हा खूप टेन्शनमध्ये आलो होतो''.(Ranbir Kapoor asked to make will before daughter raha's birth)

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी एप्रिल २०२२ मध्ये लग्न केलं. नोव्हेंबर महिन्यात त्यांनी एका क्यूट मुलीला जन्म दिला. त्यानं एका मुलाखतीत एक हैराण करणारी गोष्ट सांगितली होती जी राहाच्या जन्माशी संबंधित आहे.

रणबीरला राहाच्या जन्माआधी एका मुलाखतीत विचारलं गेलं होतं की तो आता पिता बनणार आहे तेव्हा तो इच्छापत्र करण्याचा विचार करतोय का? यावर रणबीरनं उत्तर दिलं होतं की, ''हे खूप लवकर होईल..कारण हा विचार माणून तो निवृत्त झाल्यावर करतो''.

'' काही महिने आधी माझा सीए माझ्याजवळ आला आणि म्हणाला,आपल्याला इच्छापत्र बनवण्याची गरज आहे का? मला तेव्हा एकदम भीती वाटायला लागली की मी मरणार आहे का?या वयात मी माझं इच्छापत्र का बनवू?''

हेही वाचा: कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

रणबीर म्हणाला होता,''खरंतर सत्य हेच आहे की यासगळ्या बाबतीत आपण नाही विचार करत. यावेळी मी फक्त माझ्या बाळाच्या ज्नमाचा विचार करतो,त्याच्यासोबत राहण्याची इच्छा मनात बाळगून आहे. मी कसा पिता बनेन..मला ती जबाबदारी पेलेलं नं या सगळ्या बाबतीत मी उत्सुक आहे''.

रणबीर म्हणाला होता की, तो भविष्याविषयी फार विचार नाही करत आणि तो आपलं बेस्ट व्हर्जन बनण्याचाच कायम विचार करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhagad Road Traffic Jam : पुण्यातील सिंहगड रोडवर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा, ऑफिसच्या दिशेने निघालेल्यांना मनस्ताप

Kolhapur Accident Video : कोल्हापूरमध्ये मद्यपी ट्रॅक्टर चालकाने वृद्ध महिलेला उडवलं; व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update : नागपूरच्या भांडेवाडी परिसरात आढळला बिबट्या, वनविभागाच्या वेगवेगळ्या रेस्क्यू सुरु

MPSC Success : संघर्ष ते यशाचे शिखर! सायकलवर भंगार गोळा करणाऱ्या वडिलांच्या कन्येची MPSC त राज्यात पहिली झेप

Mumbai CNG Shortage: सीएनजी कोंडीतून मुंबईकरांची सुटका, पुरवठा सुरळीत होताच पंपांवर गर्दी; ३ दिवसात कोट्यवधींचं नुकसान

SCROLL FOR NEXT