Ranbir Kapoor 'Duryodhan', Karan 'Shakuni Mama', Kangana angry again at Ramayana casting  SAKAL
मनोरंजन

Kangana Ranaut: रणबीर 'दुर्योधन' तर करण 'शकुनी मामा', रामायणाच्या कास्टिंगवर पुन्हा संतापली कंगना

ती रणबीरला हडकुळा पांढरा उंदीर असं म्हणाली होती. आता कंगनाने पुन्हा एकदा संताप व्यक्त केलाय.

Devendra Jadhav

Kangana Ranaut On Ramayan Casting News: कंगना रणौत ही विविध वक्तव्यांमुळे चर्चेत असते. अलीकडेच दंगल फेम दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी रामायण सिनेमाची घोषणा केली.

या सिनेमात श्रीरामांची भूमिका रणबीर कपूर तर सीतेच्या भूमिकेत आलीया भट झळकणार आहे. रावणाच्या भूमिकेत साऊथस्टार यश झळकणार आहे.

या सिनेमाच्या स्टारकास्ट बद्दल कंगनाने नाराजी व्यक्त केलीय. अगदी ती रणबीरला हडकुळा पांढरा उंदीर असं म्हणाली होती. आता कंगनाने पुन्हा एकदा संताप व्यक्त केलाय.

(Ranbir Kapoor 'Duryodhan', Karan 'Shakuni Mama', Kangana angry again at Ramayana casting)

कंगना रणौतने काही पोस्ट शेअर केल्या आहेत. ज्यामध्ये तिने स्टार्सच्या नावांबद्दल हिंट्स देणाऱ्यांबद्दल बरंच काही लिहिलं आहे. अभिनेत्रीने करण जोहरला महाभारतातील शकुनी मामा आणि रणबीर कपूरला दुर्योधन म्हटले आहे.

तिचा असा विश्वास आहे की, ते दोघेही तिच्याबद्दल खूप चुकीचे बोलतात आणि अफवा पसरवतात.

इतकेच नाही तर रणबीर आणि करणने दिवंगत सुशांत सिंह राजपूतवर आरोपही केले आहेत, असाही खुलासा तिने केलाय. या दोघांनीही सुशांतबद्दल चुकीच्या बातम्या पसरवल्याचं कंगनाचं ठाम मत आहे.

याशिवाय कंगनाने रणबीर आणि करणवर असाही आरोप केला आहे की, जेव्हा तिची आणि हृतिकमध्ये भांडणे सुरू होती तेव्हा रणबीर आणि करण रेफरी म्हणून काम करत होते.

हे लोक कोणत्या बेकायदेशीर कामांमध्ये गुंतले आहेत, जेव्हा माझ्या हातात पॉवर येईल तेव्हा मी सांगेल, असेही कंगना म्हणते.

कंगनाने तिच्या पोस्टमध्ये रणबीर आणि करणबद्दल म्हटले आहे की, जेव्हा तिला सत्ता मिळेल तेव्हा ती डार्क वेब, हेरगिरी आणि हॅकिंगसारख्या अवैध गोष्टींचा पर्दाफाश करेल.

करण जोहर आणि रणबीर कपूर यांनी सुशांत सिंग राजपूतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा दावाही कंगनाने केला आहे.

दोघांसाठी कंगनाने लिहिले की, माझ्या आयुष्यात आणि करिअरमध्ये या दोघांची ढवळाढवळ सहनशक्तीच्या पलीकडे आहे.

कंगनाच्या मते, सोशल मीडियाच्या ताकदीमुळे कोणाचाही आवाज दाबला जाऊ शकत नाही. कंगनाने मीडियावरही अनेक प्रश्न उपस्थित केले. दुसरीकडे कंगनाने यापूर्वी म्हटलं होतं की, रणबीर भगवान शिव झाला पण त्याचा चित्रपट कोणीही पाहिला नाही.

आता रणबीर राम बनण्याचा विचार करत आहे. तो खऱ्या आयुष्यात रावण असावा. हा कसला कलियुग? एकूणच कंगना करण आणि रणबीरवर संतापली आहे. तिने अनेकदा या दोघांना सोशल मीडियाच्या माध्यमातून खडे बोल सुनावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT