Ranbir Kapoor On Animal Trolling esakal
मनोरंजन

Ranbir Kapoor : 'अ‍ॅनिमल' च्या वादावर रणबीर कपूरनं पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, 'तुम्हाला जर...', काय म्हणाला तो?

रणबीरनं पहिल्यांदाच त्याच्या अॅनिमल चित्रपटावरुन दिलेली प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणारी आहे.

युगंधर ताजणे

Ranbir Kapoor On Animal Trolling : संदीप रेड्डी वांगाच्या अॅनिमलची जिकडे तिकडे चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनीही त्यावरुन प्रतिक्रिया दिली होती. गेल्या वर्षीचा सर्वाधिक चर्चेतील चित्रपट म्हणून अॅनिमलकडे पाहिले गेले. या सगळ्यात रणबीरची आलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय आहे.

अॅनिमलला बॉक्स ऑफिसवर जे यश मिळाले त्यानिमित्तानं एका सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये चित्रपटाची पूर्ण कास्ट सहभागी झाली होती. यावेळी रणबीरनं दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. त्यानं अॅनिमलच्या निमित्तानं जो काही वाद सुरु होता, त्यावरुन त्याचे मत पहिल्यांदाच व्यक्त केले आहे.

पीटीआयनं दिलेल्या एका बातमीनुसार, रणबीरनं म्हटलं आहे की, माझ्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून जो काही प्रतिसाद मिळाला आहे त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. हा आनंद खूप प्रेरणा देणारा आहे. मला माहिती आहे की, या चित्रपटावरुन मोठ्या प्रमाणात वादही झाला होता. त्याच्यावर टीकाही करण्यात आली होती. पण मी एकच सांगतो, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं दाखवून आणि सांगितले आहे त्याला जे काही सांगायचे आहे ते..

बॉक्स ऑफिसवर अॅनिमलला जे यश मिळाले त्यानं सिद्ध झाले आहे की, त्या आकड्यांसमोर तुम्ही काय म्हणता हे फारसं महत्वाचं नाही. तुम्ही मग एखाद्याला चांगलं म्हणा किंवा वाईट, बॉक्स ऑफिसवर आकडे काय सांगतात हे जास्त महत्वाचे. अशा शब्दांत रणबीरनं त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

अॅनिमलनं केली होती प्रचंड कमाई...

भलेही बॉलीवूडमध्ये अॅनिमलवरुन काही अंशी वाद झाला असेल, सोशल मीडियावर त्यावरुन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या असतील, मात्र अॅनिमलनं बॉक्स ऑफिसवर केलेली कमाई खूप काही सांगून जाणारी आहे. या चित्रपटानं आतापर्यत आठशे कोटींपर्यत कमाई केली आहे. वर्ल्ड वाईड कलेक्शनही तुफान असल्याचे दिसून आले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा अॅनिमलच्या दुसऱ्या पार्टविषयी गांभीर्यानं विचार करत आहेत. त्यांनी अॅनिमलच्या सिक्वेन्सचे देखील संकेत दिले आहेत. त्यात रणबीर, रश्मिका, बॉबी देओल वेगळ्या भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी रणबीरच्या अॅनिमलवर तोफ डागली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Auction Live: ३० लाखांहून थेट १.३ कोटी! गावातून आलेली २१ वर्षीय पोरगी झाली कोट्याधीश; कोण आहे Shree Charani?

Mokshada Ekadashi 2025: मोक्षदा एकादशी कधी आहे? जाणून घ्या व्रताचे नियम आणि फायदे

Latest Marathi News Live Update : बोदवडमध्ये बनावट नोटांच्या तस्करीचा संशय; ग्रामस्थांनी चार जणांना केली मारहाण

WPL 2026 Auction Live: मुंबई इंडियन्सचा अजब डाव! ५.७५पैकी एकाच खेळाडूवर खर्च केले ३ कोटी; कोण आहे ती?

पुण्यातील बँकेत चक्क दर्शनासाठी होतेय भाविकांची गर्दी, 3.5 किलो सोन्याच्या दत्त मूर्तीचं वर्षातून एकदाच दर्शन, 60 वर्षांची परंपरा

SCROLL FOR NEXT