Ranbir Kapoor Sakal
मनोरंजन

Ranbir Kapoor: रणबीर करतोय बायको अन् पोरीला मिस..., सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा भावनिक व्हिडिओ

नुकतेच बंगळुरूमध्ये झालेल्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये रणबीर कपूरने त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोकळेपणाने बोलले आहे.

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडचा लोकप्रिय स्टार रणबीर कपूर लवकरच रोमँटिक कॉमेडी 'तू झुठी मैं मक्कार' या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. बहुप्रतिक्षित चित्रपटाचे दिग्दर्शन हिटमेकर लव रंजन यांनी केले आहे.

हा चित्रपट होळीच्या मुहूर्तावर 8 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. दुसरीकडे, रणबीर सध्या 'तू झुठी मैं मक्कार'च्या प्रमोशनल टूरमध्ये व्यस्त आहे.

नुकतेच बंगळुरूमध्ये झालेल्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये रणबीर कपूरने त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोकळेपणाने बोलले आहे. प्रतिभावान अभिनेत्याने सांगितले की तो त्याची पत्नी आलिया भट्ट आणि नवजात मुलगी राहा यांना खूप मिस करत आहे. सध्या आलिया काश्मीरमध्ये तिचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चे शूटिंग करत आहे.

आलिया राहासोबत काश्मीरला गेल्याचेही त्याने सांगितले. अभिनेता म्हणाला, "आलिया काश्मीरमध्ये शूटिंग करत असून राहाला सोबत घेऊन गेली आहे. मला त्या दोघांची खूप आठवण येत आहे." रणबीर कपूरचे त्याच्या कुटुंबावर असलेले हे प्रेम पाहून सगळेच त्याचे कौतुक करत आहेत.

दिग्दर्शक लव रंजन दिग्दर्शित रणबीर कपूरचा आगामी चित्रपट 'तू झुठी मैं मक्कार' लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटात अभिनेता श्रद्धा कपूरसोबत पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. याशिवाय रणबीर कपूर 'अ‍ॅनिमल'मध्ये रश्मिका मंदान्नासोबत दिसणार आहे.

कबीर सिंग फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी या अॅक्शन थ्रिलरचे दिग्दर्शन केले आहे. रणबीर नंतर त्याच्या 2022 च्या ब्लॉकबस्टर 'ब्रह्मास्त्र' च्या पुढील भागासाठी अयान मुखर्जीसोबत काम करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT