junaid shah 
मनोरंजन

रणबीर कपूरच्या डुप्लिकेटचं निधन, हुबेहुब चेहरा पाहून ऋषी कपूर देखील झालेले हैराण

दिपालीराणे-म्हात्रे

मुंबई-  प्रसिद्ध काश्मिरी मॉडेल जुनैद शाह याचं निधन झालं आहे. जुनैद शाह बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरसारखा हुबेहुब दिसण्यामुळे खूप चर्चेत असायचा. जुनैद शाह अभिनेता रणबीर कपूर सारखाच दिसायचा. नुकतंच त्याचं निधन झाल्याची दुःखद बातमी येतेय. श्रीनगर येथे इलाही बागमधील त्याच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं. याची माहिती काश्मिरचे प्रसिद्ध पत्रकार यूसुफ जुनैद यांनी दिली आहे.

पत्रकार यूसुफ जुनैद यांच्या त्यांच्या ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करुन सांगितलं आहे की, 'रात्री उशीरा आमचे शेजारी निसार अहमद शाह यांचा मुलगा जुनैद शाह याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. लोक त्याला बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरचा डुप्लिकेट म्हणायचे.'

जुनैद शाह रणबीर कपूरचा डुप्लिकेट म्हणून खूप प्रसिद्ध होता. यामुळेच सोशल मिडियावर देखील त्याच्या चाहत्यांची संख्या चांगलीच मोठी होती. जुनैद शाह देखील रणबीर कपूरची स्टाईल आणि त्याचा पेहराव या गोष्टींना फॉलो करायचा.

आश्चर्याची बाब म्हणजे खुद्द रणबीर कपूरचे वडिल आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनीही सोशल मिडियावर जुनैद शाहचं कौतुक केलं होतं.  २०१५ साली दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी मुलगा रणबीर कपूर आणि जुनैद शाह याच्या फोटोचं कोलाज त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी जुनैद शाहचं कौतुक केलं होतं.

ऋषी कपूर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलं होतं, 'अरे देवा माझ्या मुलाचा डुप्लिकेट, विश्वासंच बसत नाहीये. एक चांगला डुप्लिकेट. ' 

२००७ साली रणबीर कपूरने सावरिया या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. तेव्हा त्याचा डुप्लिकेट जुनैद शाह कॉलेजमध्ये शिकत होता. हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर लोक जुनैदला रणबीर कपूरचा डुप्लिकेट म्हणू लागले. जुनैद शाहने काश्मिर युनिवर्सिटीमधून एमबीए केलं होतं. त्यानंतर त्याने मॉडेलिंग सुरु केली होती.   

ranbir kapoor look alike junaid shah passes away due to cardiac arrest  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT