Ranbir Kapoor 
मनोरंजन

Ranbir Kapoor : 'बॉयकॉट करायला फार मजा येते का?' रणबीर संतापला!, आम्ही म्हणजे...

गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूडमध्ये वेगळ्याच प्रकारचे वारे वाहत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टी विरुद्ध दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी असा वाद झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Ranbir Kapoor On Boycott Bollywood : आम्ही तुमचे मनोरंजन करतो आणि तुम्ही आम्हालाच सारखे ट्रोल करता हे तुम्हाला आवडते का, आणि तुम्ही असे का करता असा प्रश्न रणबीरनं नेटकऱ्यांना, चाहत्यांना केला तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. रणबीरचा मूड काही वेगळाच असल्याचे त्यांना जाणवले.

गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूडमध्ये वेगळ्याच प्रकारचे वारे वाहत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टी विरुद्ध दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी असा वाद झाला आहे. मागच्या वर्षांपासून हा वाद चर्चेत आला आहे. कोरोनाच्या काळात टॉलीवूडच्या चित्रपटांना बॉलीवूडच्या प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते.

येत्या दिवसांत रणबीर आणि श्रद्धा कपूरचा तू झुठी मैं मक्कार नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्याच्या प्रमोशनच्या निमित्तानं रणबीर वेगवेगळ्या ठिकाणी मीडियाशी संवाद साधतो आहे. यावेळी त्यानं बॉयकॉट बॉलीवूडवर आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे. लव रंजन यांनी दिग्दर्शित केलेल्या तू झुठी मैं मक्कार चित्रपटाची चाहते आतूरतेनं वाट पाहत आहे.

या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा त्याची चर्चा सुरु झाली. श्रद्धा कपूरसोबतच्या गाण्याला प्रेक्षकांनी पसंती मिळताना दिसत आहे. यावेळी रणबीरला जेव्हा बॉयकॉट बॉलीवूडवरुन प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यानं दिलेलं उत्तर अनेकांच्या चर्चेचा विषय ठरतो आहे. रणबीर म्हणाला, असं काय कारण आहे की तुम्ही आम्हाला बॉयकॉट करण्याचा विचार करता.

काहीही झालं की बॉयकॉट हा ऑप्शन आहे का, तुम्ही आम्हाला बॉयकॉट करता तेव्हा तुम्हाला फार मजा वाटते का, मला यावर जास्त काही बोलायचे नाही. मनोरंजनाचे माध्यम म्हणून चित्रपटाकडे पाहा, बाकी कसला विचार करु नका. हेच मला सांगायचे आहे. आम्हाला काय जगाला वाचवायचे नाही. तेव्हा आमच्यावर बॉयकॉटचा शिक्का मारु नका.अशा शब्दांत रणबीरनं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT