Ranbir Kapoor and Alia  Sakal
मनोरंजन

Ranbir Kapoor: 'आलिया लेबर रूममध्ये होती तेव्हा...', रणबीर कपूरनं सांगितला तो अनुभव

सध्या रणबीर त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'तू झुठी मैं मक्कार'च्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटात तो पहिल्यांदाच श्रद्धा कपूरसोबत दिसला आहे.

सकाळ डिजिटल टीम

रणबीर कपूर हा बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या रणबीर त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'तू झुठी मैं मक्कार'च्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटात तो पहिल्यांदाच श्रद्धा कपूरसोबत दिसला आहे.

त्याच वेळी, चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर रिलीजच्या 12 दिवसांत 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत रणबीरने आलियासोबतच्या त्याच्या लेबर रूमच्या अनुभवाबद्दल सांगितले.

रणबीर कपूर त्याची चुलत बहीण करीना कपूरच्या शो 'व्हॉट वुमन वॉन्ट'मध्ये पोहोचला होता. यादरम्यान अभिनेत्याने स्वतःला वडील म्हणून रेट केले. रणबीरने त्याच्या लेबर रूमच्या अनुभवाबद्दल देखील सांगितले 'तो अनुभव खूप चांगला होता' असे तो म्हणाला.

यासोबतच राहाच्या जन्मावेळी तो आठवडाभर रुग्णालयातच होता, अशी माहितीही समोर आली आहे. जेव्हा आलियाने आपल्या मुलीला मिठी मारली तेव्हा त्याने त्याला 'जादुई' क्षण म्हटले. स्वत:ला वडील म्हणून रेटिंग देण्याच्या प्रश्नावर रणबीर म्हणाला की, मला स्वत:ला 7 रेटिंग द्यायला आवडेल.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रणबीर कपूर लवकरच रश्मिकासोबत अॅनिमलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर सिंग फेम संदीप रेड्डी वंगा यांनी केले असून तो यावर्षी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय रणबीरचे अनेक आगामी प्रोजेक्ट पाइपलाइनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price: सोन्यातील गुंतवणुकीसाठी सरकारची नवी योजना; घरात ठेवलेल्या सोन्यावर मिळणार व्याज, काय आहे स्कीम?

Pandharpur Shegaon Railway : पंढरपूर–शेगाव रेल्वे मार्गासाठी प्रयत्नांना बळ; पुण्यात DRM यांच्याशी सविस्तर चर्चा

Marathi News Live Updates : राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने अंकित श्रीवास्तव यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली

Pune News: सिंहगडावर प्रवेशाची नवी पद्धत! ॲपद्वारे पूर्वनोंदणी, गर्दी वाढल्यास प्रवेश बंद, वन विभागाचा मोठा निर्णय

ICC Test Rankings: बुमराह खेळत नसूनही अव्वल, तर ट्रॅव्हिस हेडनं गमावलं पहिल्या क्रमांकाचं सिंहासन! आता कोण झालं 'नंबर वन'?

SCROLL FOR NEXT