Ranbir Kapoor Viral Video
Ranbir Kapoor Viral Video Esakal
मनोरंजन

Viral Video: रणबीर कपूरच्या अंगावर पडली गरम कॉफी.. भर कार्यक्रमात घडलेल्या प्रसंगानं मंचावरच्या सगळ्यांचीच पळापळ

प्रणाली मोरे

Ranbir Kapoor Viral Video : बॉलीवूड स्टार्सचे ऊप्स मोमेंट तुम्ही अनेकदा ऐकले असतील. कधी कोणी आपल्या ड्रेसमुळे अडचणीत सापडतं तर कधी कुणी आपल्या चपलांमुळे. पण सध्या व्हायरल होत असलेला रणबीर कपूरचा व्हिडीओ पहाल तर तो एकदम वेगळ्याच लेवलचा आहे.

बोलण्यात हरवल्यामुळे रणबीर कपूर ऊप्स मोमेंटचा शिकार झाला आहे. आणि मग असं काही घडलं की ज्यामुळे कार्यक्रमाच्या होस्टपासून उपस्थित साऱ्यांचीच तारांबळ उडाली. रणबीर कपूरचं तर हसू थांबेना आणि नतंर त्याला लागलीच वॉशरुम गाठावं लागलं.(Ranbir Kapoor Oops Moment viral video)

व्हायरल व्हिडीओत दिसत आहे,रणबीर कपूर माइकवर काहीतरी बोलत आहे. तो आपल्या बोलण्यात इतका मग्न आहे की त्याच्या लक्षातही राहिलं नाही की त्याच्या एका हातात गरम कॉफीचा कप आहे.

एका प्रसंगी रणबीर हाताची मूठ बंद करण्याचा प्रयत्न करतो की तितक्यात हातातला माइक कपवर आपटून त्याच्यातील कॉफी रणबीरच्या पॅंटवर उलटते. ओह...आणि हे सगळं इतकं पटकन घडतं की त्याच्यासोबत सगळेच हसू लागतात.पण सगळ्यांची धावाधावही होते.

सोशल मीडियावर तर हा व्हिडीओ पाहून लोकांना हसू आवरत नाहीय. अर्थात अनेकांना गरम कॉफी रणबीरच्या पायावर पडल्यानं चिंता देखील वाटतेय तर अनेकांनी रणबीरला यावरनं ट्रोलही केलं आहे.

एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,'आलिया विचारेल आता तुला,रणबीर कॉफी अंगावर पाडायला तुला दुसरी जागा मिळाली नाही'. तर आणखी एकानं लिहिलं आहे,'माझ्यासोबत दिवसातून १० वेळा असं होतं'. एकानं तर चक्क लिहिलंय,'हे काय रणबीर,बाबा बनलायस तरी अशा लहान मुलांसारख्या हरकती करतोस तू?'

रणबीरच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचं झालं तर त्यानं नुकतंच त्याच्या 'एनिमल' सिनेमाचं शूट पूर्ण केलं आहे. या सिनेमात त्याच्यासोबत रणबीर कपूर,बॉबी देओल देखील आहे. दोघांनी सिनेमासाठी बल्कि लूक ठेवला होता. चाहत्यांना त्यांचा तो लूक भलताच आवडला आहे. आता सिनेमा लोकांना किती भावतो हे देखील लवकरच कळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT