ranbir kapoor 
मनोरंजन

रणबीर कपूरला कोरोनाची लागण; काका रणधीर यांनी दिली माहिती

स्वाती वेमूल

कोरोनाची परिस्थिती गेल्या महिन्यात नियंत्रणात येईल, अशी चिन्हे दिसत असतानाच कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. अभिनेता रणबीर कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून रणबीर विविध प्रोजेक्ट्सच्या शूटिंगनिमित्त बाहेर होता. आता रणबीरने कोरोनाची चाचणी केल्याची माहिती त्याचे काका रणधीर कपूर यांनी दिली. याआधी रणबीरची आई नीतू कपूर यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली होती. चंदिगडमध्ये 'जुग जुग जिओ' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांना कोरोना झाला होता. नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित रणबीर घरीच क्वारंटाइनमध्ये असल्याचं सांगितलं. 

कोरोना आणि लॉकडाउनमुळे बऱ्याच चित्रपटांचं शूटिंग रखडलं होतं. त्यात रणबीरचेही चित्रपट होते. या वर्षाच्या सुरुवातीपासून रणबीर त्याच्या आगामी चित्रपटांच्या कामात व्यग्र झाला. यामध्ये 'ब्रह्मास्त्र', 'शमशेरा', 'अॅनिमल' या चित्रपटांचा समावेश आहे. तर लव रंजन दिग्दर्शित चित्रपटातही रणबीर मुख्य भूमिका साकारणार आहे. मात्र या चित्रपटाचं नाव अद्याप ठरलेलं नाही. 

गेल्या २४ तासांत मुंबई १३६० कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना का डोकं वर काढत आहे, याची तपासणी करण्यासाठी केंद्र सरकारने पाहणीसाठी एक पथक पाठवलं होतं. केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर कोरोना संपला आहे, असं समजून लोकांचा वाढता निष्काळजीपणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झालेल्या निवडणुका, लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये झालेली वाढ ही कारणे कारणीभूत आहेत. तसंच लोकलसह इतर सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु करणे अशा काही गोष्टींमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याचं निरीक्षण केंद्रीय पथकाने नोंदवलं आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT