Ranbir Kapoor and Alia Bhatt Google
मनोरंजन

लग्नाआधी रणबीरची 'बॅचलर पार्टी';जाणून घ्या कोणते सेलिब्रिटी लावणार हजेरी

रणबीर कपूरनं आयोजित केलेली बॅचलर पार्टी त्याच्या राहत्या घरी असल्याचं कळत आहे.

प्रणाली मोरे

बॉलीवूडमधले मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणून रणबीर(Ranbir Kapoor)-आलिया(Alia Bhatt) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. रणबीर आणि आलिया भट्ट हे या वर्षातलं सगळ्यात मोठं चर्चेतलं लग्न ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून रणबीर आणि आलियाचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. बातमी आहे की हे दोघे याच महिन्यात लग्न करणार आहेत. आता असंही ऐकायला मिळतंय की लग्नाच्या आधी रणबीर कपूर एका जंगी बॅचलर पार्टीचं आयोजन करणार आहे. आणि मीडियाच्या हाती पार्टीत कोण-कोण सामिल होणार आहेत याची लिस्टही लागली आहे.

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार रणबीर कपूरच्या जवळच्या काही सूत्रांकडून समजतंय की लग्नाच्या आधी रणबीरनं बॅचलर पार्टीचं आयोजन केलं आहे. या पार्टीत त्याचे काही जवळचे मित्र सामिल होणार आहेत. यात काही त्याचे बालपणीचे मित्रदेखील आहेत. यात बॉलीवूडमधील रणबीरच्या काही जिगरी दोस्तांची नावं देखील सामिल आहेत. यात अर्जुन कपूर,आदित्य रॉय कपूर,अयान मुखर्जी यांच्यासोबत काही जणांची नावं कळाली आहेत. रणबीर आणि आलिया भट्ट गेल्या काही दिवसांपासून अयानसोबत त्याच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमावर काम करीत आहेत. ही पार्टी रणबीरनं आपल्या घरातच आयोजित केली आहे. तुर्तास यासंबंधितची अधिक माहिती प्राप्त व्हायची आहे.

रणबीर आणि आलिया या महिन्याच्या १७ एप्रिलला लग्न करणार आहेत असं बोललं जातंय. आलिया भट्टचे आजोबा नरेंद्रनाथ राजदान यांची तब्येत खूप बिघडली आहे आणि त्यांची आलिया आणि रणबीरचं लग्न पाहण्याची इच्छा आहे. त्यामुळे आलियाच्या कुटुंबाला हे लग्न लवकर व्हावं असं वाटत आहे. कदाचित आलियाच्या आजोबांच्या तब्येत पाहता १७ एप्रिल ही तारिख पुढे-मागे होऊ शकते. रणबीर आणि आलिया करूर कुटुंबाच्या जुन्या घरात म्हणजे आर के हाऊस मध्ये लग्न करणार आहेत. याचठिकाणी १९८० मध्ये नीतू कपूर आणि ऋषि कपूर यांचं लग्न झालं होतं. आणि त्यामुळे रणबीरला देखील आरके हाऊस मध्येच लग्न करायचं आहे असं बोललं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Stock Market Holiday: 3 एप्रिलला शेअर बाजार बंद? सलग 3 दिवस बाजार बंद राहणार! जाणून घ्या अपडेट

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

SCROLL FOR NEXT