Ranbir Kapoor Instagram
मनोरंजन

Ranbir Kapoor: 'गर्लफ्रेंड फसवतेय हे कसं ओळखायचास?',पत्रकाराच्या प्रश्नावर रणबीरचं भन्नाट उत्तर..

'तू झूठी, मै मक्कार' या सिनेमाच्या ट्रेलर रिलीज दरम्यान पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना रणबीरचा सेन्स ऑफ ह्युमर पाहून सगळेच थक्क झाले.

प्रणाली मोरे

Ranbir Kapoor: रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा 'तू झूठी मै मक्कार' सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. पहिल्यांदाच रणबीर आणि श्रद्धाची जोडी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. दिग्दर्शक लव रंजनच्या या सिनेमात स्टॅंड अप कॉमेडियन अनुभव सिंह बस्सी देखील आहे. ट्रेलर लॉंचिंग कार्यक्रमात सिनेमाची स्टारकास्ट आणि मेकर्स सगळेच उपस्थित राहिले होते.

यादरम्यान पत्रकारांनी कलाकारांना काही भन्नाट प्रश्न विचारुन भंडावून सोडलं. सिनेमाच्या नावासंबंधित एक प्रश्न रणबीरला विचारला गेला ज्याचं मजेदार अंदाजात रणबीरनं उत्तर दिलं आहे. (Ranbir kapoor tu jhoothi main makkar trailer release repiled to reporter questions )

एका पत्रकारानं रणबीरला प्रश्न केला की,'जितक्या मुली तुझ्या आयु्ष्यात आल्या त्यापैकी तुला कुणी फसवलं असेल ते तुला कसं समजायचं?' यावर रणबीर म्हणाला,''ते मी सांगू शकणार नाही पण इतकं माहिती पडलं की प्रश्न विचारणारे तुम्ही चालू आहात'

या व्हिडीओवर एका नेटकऱ्यानं कमेंट करत लिहिलं की,'रणबीरचा सेंस ऑफ ह्युमर खूपच सॉल्लिड आहे'. तर दुसरा एक जण म्हणाला,'रणबीरनं मस्त उत्तर दिलं'. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'रोस्ट केलं एका सेकंदात'. तर एकानं चक्क लिहिलं की,'गर्लफ्रेंड आधीच यानं धोका दिला असेल'.

'तू झूठी मै मक्कार' हा सिनेमा आजच्या तरुणाईचा सिनेमा आहे. ८ मार्च,२०२३ रोजी हा सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. लव रंजननं या सिनेमाला दिग्दर्शित केलं आहे. सिनेमाचे निर्माते लव रंजन आणि अंकुर गर्ग हे आहेत. टी-सीरिजचे भूषण कुमार सिनेमाचे प्रस्तुतकर्ता आहेत.

रणबीरच्या याआधी रीलिज झालेल्या ब्रह्मास्त्रमध्ये आलिया भट्ट होती. सिनेमा बॉक्सऑफिसवर सुपरहिट झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT