Ranbir Kapoor's FIRST look from Animal Google
मनोरंजन

Ranbir Kapoor: 'एनिमल' च्या फर्स्ट लूक मध्ये रणबीरला पाहून लोक म्हणू लागले,'अरे हा तर..'

Animal सिनेमात रणबीर कपूरसोबत पहिल्यांदाच नॅशनल क्रश रश्मिका मंदाना झळकणार आहे.

प्रणाली मोरे

Ranbir Kapoor: एकीकडे जिथे रणबीरचा 'शमशेरा' सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगलाच आपटला होता तिथे दुसरीकडे त्याच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर चाहते वाट पाहत होते ते आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या आगामी सिनेमाची. 'तू झूठी मै मक्कार' सिनेमानंतर आता 'एनिमल' सिनेमातील रणबीरचा फर्स्ट लूक रिव्हील झाला आहे. रणबीरच्या या लूकवर सोशल मीडियावर लोकांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.(Ranbir Kapoor's FIRST look from Animal)

रणवीरच्या 'एनिमल' सिनेमातील लूकवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. एकीकडे जिथे सेलिब्रिटी या लूकला पसंत करत कमेंट करताना दिसत आहेत तिथे दुसरीकडे सोशल मीडियावर नेटकरी रणबीरच्या या लूकला केजीएफच्या यशच्या व्यक्तिरेखेवरनं इन्स्पायर असल्याचं बोलताना दिसत आहेत.

रणबीर कपूर याआधी आपल्याला 'ब्रह्मास्त्र' सिनेमात दिसला होता. या सिनेमातून पहिल्यांदाच रणबीर आणि आलियाचा जोडी एकत्र पडद्यावर पहायला मिळाली होती. या सिनेमाचं दिग्दर्शन अयान मुखर्जीनं केलं होतं. रणबीरच्य आगामी सिनेमाविषयी बोलायचं झालं तर लवकरच तो रश्निका मंदाना,अनिल कपूर,बॉबी देओल,तृप्ती डिमरी सोबत आपल्याला 'एनिमल' सिनेमात दिसणार आहे.

या व्यतिरिक्त रणबीर कपूरचा लव रंजनचा रॅम कॉम सिनेमा 'तू झूठी मैं मक्कार' सिनेमा आपल्या भेटीस येत आहे. या सिनेमात रणबीर कपूरची जोडी श्रद्धा कपूरसोबत जमली आहे. हा सिनेमा ८ मार्च २०२३ रोजी रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

SCROLL FOR NEXT