Randeep Hooda esakal
मनोरंजन

Randeep Hooda Injured : घोड्यावरुन पडल्याचे निमित्त रणदीप हुडाला गंभीर दुखापत, रुग्णालयात दाखल

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुडाच्या चाहत्यांच्या मनात धडकी भरवणारी बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Randeep Hooda Bollywood Actor Fall down horse : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुडाच्या चाहत्यांच्या मनात धडकी भरवणारी बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ती म्हणजे त्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणदीप हा मुंबईतील कोकिलाबेन रुग्णलयात उपचार घेत आहे. खरं तर तो घोडेस्वारी करताना त्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यावेळी तो पडला आणि बेशुद्ध झाला. यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही वेळेपूर्वी रणदीपच्याबाबत हा धक्कादायक प्रकार घडल्याचे सांगण्यात आले आहे.

Also Read - पुण्याचा पहिला 'माॅल'- तुळशीबाग

डॉक्टरांनी रणदीपला पूर्णपणे बेड रेस्ट सांगितली आहे. त्याला बराचकाळ आराम करावा लागणार आहे. यापूर्वी देखील रणदीपला अशाप्रकारे अपघात झाला आहे. एकदा त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती त्यावेळी तो सलमानसोबत राधेची शुटींग करत होता. ती दुखापत एवढी गंभीर होती की, त्याच्या गुडघ्याची सर्जरी करावी लागली होती.

आता पुन्हा रणदीप जखमी झाल्यानं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यानं चाहत्यांसाठी एक खास पोस्ट देखील शेयर केली आहे. चाहत्यांनी त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. रणदीपच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला पुन्हा सर्जरी करावी लागणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नुकताच रणदीप हुडाची कॅट नावाच्या वेबसीरिजमध्ये दिसला होता. त्यामध्ये त्यानं केलेल्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतूक केले होते. याशिवाय तो येत्या काळात साई कबीरची फिल्म मर्दमध्ये देखील दिसणार आहे. तो चित्रपट ६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT