Randeep Hooda Lin Laishram Reception: Esakal
मनोरंजन

Randeep Hooda-Lin Laishram: रणदीप- लिनची रिसेप्शन पार्टी दणक्यात! कलाकारांची भरली जत्रा; व्हिडिओ व्हायरल

Randeep Hooda Lin Laishram wedding Reception: बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा याने 29 नोव्हेंबर रोजी मॉडेल आणि अभिनेत्री लिन लैश्रामसोबत लग्न केले.

Vaishali Patil

Randeep Hooda Lin Laishram wedding Reception: बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा याने 29 नोव्हेंबर रोजी मॉडेल आणि अभिनेत्री लिन लैश्रामसोबत लग्न केले. मणिपूरमधील इंफाळ येथे पारंपारिक सोहळ्यात या जोडप्याने लग्न गाठ बांधली होती. नातेवाईक आणि काही जवळचे लोक या लग्नसोहळ्यात सहभागी झाले होते.

तर 11 डिसेंबर रोजी नवविवाहित जोडप्याने सोमवारी मुंबईत एका भव्य रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. या रिसेप्शन पार्टीला इंडस्ट्रीतील अनेक मोठ मोठ्या कलाकरांनी हजेरी लावली होती.

रणदीप -लिनच्या लग्नाच्या रिसेप्शनचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पार्टीला उर्वशी रौतेला ते तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा, मोना सिंह यासह अनेक कलाकार आले होते.

रिसेप्शन पार्टीमध्ये, लिनने सोनेरी बांगड्या आणि लाल रंगाची साडी घातली होती. तिने नेकपीस, कानातले, बांगड्या आणि अंगठी घातली होती. लिन लैश्राम या देसी लूकमध्ये खुपच सुंदर दिसत होती. तर रणदीपने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. हातात हात धरून त्यांनी पाहूण्यांचे स्वागत केले. तर यावेळी लिन लैश्रामच्या आई-वडीलांनी मणिपुरी कपडे घातलेले होते.

या रिसेप्शन पार्टीला टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध स्टार्सने हजेरी लावली. या पार्टीत 'जब वी मेट'चे दिग्दर्शक इम्तियाज अली मुलगी इडासोबत आले होते. यावेळी इडाने व्हाइट कर्ल ड्रेस परिधान केला होता. तर मोना सिंह पतीसोबत पार्टीत दिसली तिने निळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस घातला होता. यासोबत या पार्टीला जॅकी श्रॉफ, जावेद जाफरी आणि चंकी पांडे यांनीही हजेरी लावली होती.

आहाना कुमरा जांभळ्या रंगाच्या साडीत सुंदर दिसत होती तर सयानी गुप्ता, इम्तियाज अली आणि त्यांची मुलगी इदा अली, मानवी गाग्रू, विशाल भारद्वाज आणि आशुतोष गोवारीकर यांसारखे कलाकार दिसले. सध्या या पार्टीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

47 वर्षीय रणदीप आणि 37 वर्षीय लिन बरेच दिवस रिलेशनशिपमध्ये होते. लिन ही एक मॉडेल, अभिनेत्री आणि बिझनेसवुमन आहे. तर रणदीप 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटात दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: फक्त 'या' एका मुद्द्यावरुन अमेरिका-इराणचा सामंजस्य करार रखडला; दोन तासांच्या बैठकीनंतर व्हाईट हाऊसने दिलं स्पष्टीकरण

पीरिअड्स सुरू असतानाही अभिनेत्रीचं पूलमध्ये शूटिंग, अभिनेत्रीने सांगितला पाण्यात 8 तास सीनचा अनुभव, म्हणाली....

Petrol-Diesel-CNG Price: कच्च्या तेलाचे भाव घसरल्यानंतर पेट्रोल-डिझेल-CNGचे नवे दर जाहीर; मुंबई, पुणे आणि इतर जिल्ह्यांमध्ये दर पाहा

Latest Marathi Update Live: निदा खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

Pune liquor tragedy: माहिती असूनही कारवाई नाही! 15 जणांच्या मृत्यूनंतर पोलिसांवर निलंबनाची कारवाई, अवैध दारूकडे दुर्लक्ष महागात!

SCROLL FOR NEXT