मनोरंजन

Randeep Hooda: 'घाबरुन स्वत:ला खोलीत बंद करायचो अन्...' या चित्रपटामुळे नैराश्यात गेला होता रणदीप!

Vaishali Patil

Randeep Hooda: रणदीप हुडा हा बॉलीवुडमधला दमदार अभिनेता आहे. रणदीपने आजवर अनेक सिनेमांमधुन स्वतःचं स्थान कमावलं आहे. रणदीप खऱ्या अर्थाने प्रत्येक भुमिकेसाठी मेहनत घेत असतो. तो सध्या त्याच्या 'स्वतंत्र वीर सावरकर' या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे.

या चित्रपटासाठीही त्याने खुप मेहनत घेतली आहे. या चित्रपटासाठी त्याने तब्बल 25 किलो वजन कमी केले. मात्र आता त्याने त्याच्या जुन्या चित्रपटाच्या वाईट अनुभवाबद्दल सांगितले आहे. ‘बॅटल ऑफ सारागढी’ या चित्रपटाबाबत तो बोलत होता. या चित्रपटानंतर रणदीपची वाईट अवस्था झाली आणि तो डिप्रेशन गेल्याचं त्याने सांगितलं.

मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान रणदीपने त्याचा ‘बॅटल ऑफ सारागढी’ रिलीज न झाल्याबद्दल भाष्य केले आहे. चित्रपट प्रदर्शित न झाल्यामुळे तो खुप दु:खी झाला होता. त्याची फसवणूक झाल्याचे त्याने सांगितले. तो या चित्रपटात ईशर सिंगची भुमिका करत होता. यासाठी त्याने तीन वर्ष मेहनत घेतली होती.

त्याने खुलासा केला की प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याची संधी मिळाली नाही. यासाठी त्याने 3 वर्षे मेहनत घेतली यासाठी त्याने केस आणि दाढी वाढवली होती, त्या भूमिकेसाठी रणदीपने अनेक चित्रपट नाकारले होते.

त्यानंतर अक्षय कुमारने 2018 मध्ये आलेल्या ‘केसरी’ चित्रपटाची घोषणा केली त्याच वर्षी केसरी सिनेमा प्रदर्शित झाला. यामुळे रणदीपनं तीन वर्षे घेतलेली मेहनत वाया गेली आणि याचा परिणाम म्हणजे तो नैराश्यात गेला.

याबद्दल बोलतांना अभिनेता म्हणाला की, मी नैराश्याच्या मोठ्या टप्प्यातून गेलो आहे. मी सारगढीसाठी एक्स्ट्रक्शन सोडण्याचा विचार केला. हातात चित्रपट नसल्याने मी निराश होतो. माझे पालक मला एकटं सोडत नव्हते. कोणीतरी माझी दाढी कापेल या भीतीने मी स्वतःला माझ्या खोलीत कोंडून घ्यायचो. मग मी ठरवलं की माझ्यासोबत असं पुन्हा होऊ द्यायचं नाही.

रणदीपने अजूनही केसरी हा चित्रपट पाहिलेला नाही. तो मार्शल आर्ट्सचे अनेक प्रकार शिकला आहेत आणि एका शीख सैनिकासारखे कौशल्य त्याच्याकडे आहे. शारीरिक प्रशिक्षण, शीख संस्कृती आणि परंपरांबद्दल शिकणे आणि लढाईचे ऐतिहासिक पैलू त्याने समजून घेतले. त्याने ही भूमिका साकारण्यासाठी खुप तयारी केली होती.

रणदीपच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच स्वतंत्र वीर सावरकर या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो विनायक दामोदर सावरकरांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा भटक्या कुत्र्यांबाबत मोठा निर्णय ! शेल्टर होममध्ये ठेवता येणार नाही, नसबंदी हाच योग्य उपाय

AUS vs SA 2nd ODI: १९८७ नंतर वन डेत चमत्कार! भारताच्या दिग्गजानंतर 'हा' पराक्रम करणारा मॅथ्यू ब्रित्झके दुसराच फलंदाज ठरला

"आई अचानक आम्हाला सोडून गेली आणि.." ज्योती चांदेकरांच्या लेकीची आईच्या आठवणीत भावूक पोस्ट

Maharashtra Latest News Live Update : नागपुरात उद्या तान्हा पोळ्याच्या पार्श्वभूमीवर भोसलेकालीन काळी-पिवळी मारबत मिरवणूक निघणार..

Raisin Trader Fraud : पन्नास लाख रुपयांऐवजी कोऱ्या कागदांचे दिले बंडल, बेदाणा व्यापाऱ्याकडून दिल्लीतून साथीदारांनी उचलली रक्कम

SCROLL FOR NEXT