randeep hooda play role of swatantryaveer sawarkar  sakal
मनोरंजन

रणदीप हुडा सावरकरांच्या भूमिकेत.. महेश मांजरेकरांची मोठी घोषणा..

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती १३९ व्या जयंतीनिमित्त दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नव्या चित्रपटाची घोषणा केली.

नीलेश अडसूळ

दिग्दर्शक महेश मांजरेकर (mahesh manjrekar) यांनी सध्या नवनवीन चित्रपटांचा जणू सपाटाच लावला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी वीर दौडले सात या चित्रपटाची घोषणा केली होती. त्याला काही दिवस उलटले असतानाच त्यांनी एका नव्या चित्रपटाची घोषणा केली. आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (swatantraveer sawarkar movie) यांच्या १३९ व्या जयंतीचार औचित्य साधून मंगेश मांजरेकर सावरकरांच्या आयुष्यावर चित्रपट करत असल्याचे उघड केले. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्यांनी मोशन पोस्टर शेअर करत या चित्रपटाची माहिती दिली. त्यामध्ये सावरकरांच्या भूमिकेत रणदीप हुडा (randeep hooda as swatantraveer sawarkar) आहे. (Randeep Hooda’s first look as Swatantra Veer Savarkar launched on latter 139th birth anniversary)

हा पोस्टर शेअर करत दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सावरकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबत एक कॅपशन ही दिले आहे. 'सावरकरांबद्दल लोकांच्या वेगवेगळ्या धारणा आहेत पण चित्रपट बनवताना सावरकरांच्या विचारांपर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न आहे. निर्माता म्हणून सावरकरांचे विचार आम्ही चित्रपटातून मांडणार आहोत. त्यामुळे चित्रपटात सावरकरांच्या खऱ्या आयुष्यात फारसा फरक नसेल. सावरकर हे एक स्वातंत्र्यसैनिक होते आणि आपण त्यांना कधीही विसरू शकत नाही.'असे मांजरेकरांनी लिहिले आहे. (mahesh manjrekar new movie swatanraveer sawarkar)

चित्रपटाची निर्मिती संदीप सिंह आणि आनंद पंडित यांनी केली असून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांच्या प्रमुख भूमिकेत अभिनेता रणदीप हुड्डा आहे. चित्रपटाचे शूटिंग यावर्षी ऑगस्ट महिन्यात सुरू होईल असे माहिती समोर आली आहे. 'या व्यक्तीरेखेसाठी रणदीपने विशेष मेहनत घेतली आहे. या चित्रपटावर आम्ही दोन वर्षांपासून काम करत आहोत. सावरकरांना कधीच यथोचित सन्मान मिळाला नाही. सावरकरांचे खरे चरित्र या निमित्ताने देशाला कळेल,' असे निर्माते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Festival Travel: बाप्पाच्या भेटीसाठी लालपरी सज्ज! कोकणात एसटीच्या ५,००० जादा बसेस धावणार!

Shivsena : 'राजू शेट्टींची प्रकरणे माझ्याकडे, सतेज पाटील बगलबच्च्यांना पुढे करतात'; 'शक्तिपीठ'वरून क्षीरसागरांच्या शिलेदाराची टीका

Latest Marathi News Live Updates : भोयर बायपासवर रस्त्याच्या मागणीसाठी रास्तारोको

'८७ रुपयांचा शाईचा पेन'ची रशियातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड; बालकलाकाराचा आनंद गगनात मावेना

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर महिनाभरात २.२४ लाख वाहनांची वर्दळ; एका महिन्यात २० कोटींचा महसूल

SCROLL FOR NEXT