Kareena Kapoor,Randhir Kapoor,Karishma Kapoor Google
मनोरंजन

करिश्मा-करिनाने वडिलांना घेतलंय दत्तक? रणधीर कपूर हे काय म्हणतायत...

आज या ज्येष्ठ अभिनेत्याचा ७५ वा वाढदिवस कपूर कुटुंब सेलिब्रेट करीत आहेत.

प्रणाली मोरे

ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांच्या ७५ वाढदिवसानिमित्तानं त्यांच्या आयुष्यातील काही खास आठवणींनाआपण आजा उजाळा देऊया. त्यांच्या एका जुन्या मुलाखतीतल्याच काही आठवणींविषयी आज आपण जाणून घेऊया. आपल्या मुलींसाठी त्यांच्या मनात विशेष प्रेम आणि जिव्हाळा आहे. करिना-करिश्मा कपूर विषयी प्रश्न विचारताच त्यांनी विनोदात म्हटलं होतं,''माझ्या मुली माझ्यापेक्षा श्रीमंत आहेत त्यामुळे त्यांनी मला दत्तक घेतलं आहे''. या मुलाखतीत त्यांनी करिना-करिष्मा कपूर या आपल्या मुलींविषयी मनमोकळा संवाद साधला होता.

रणधीर कपूर म्हणजे बॉलीवूडचे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक राज कपूर यांचे मोठे चिरंजीव. रणधीर कपूर यांनी अगदी लहान वयात सिनेमात बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. तारुण्यात पदार्पण केल्यानंतर त्यांनी पहिला सिनेमा केला तो १९७१ मध्ये. त्या सिनेमाचं नाव होतं 'कल,आज और कल'. अर्थात त्यांनी आपले काही सिनेमे हे आपले आजोबा पृथ्वीराज कपूर आणि वडिल राज कपूर याच्या दिग्दर्शनाखाली केलेले आहेत. काही वर्षांपूर्वी पर्यंत देखील ते सिनेमात सक्रिय होते. त्यांनी अक्षय कुमार सोबत 'हाऊसफुल' आणि 'हाऊसफुल २' या सिनेमांत काम केले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं,''माझ्या सिनेकरिअर मध्ये यशस्वी इनिंग मी खेळलो आहे. कितीतरी चौकार,षटकारही लगावले आहेत. तसं मी निवृत्त पूर्णपणे झालोय असं अजिबात म्हणणार नाही''.

मी आजही मला एखाद्या सिनेमाचं कथानक आवडलं तर काम नक्कीच करेन. किंबहुना मी करतो. माझ्या मुली आता त्यांच्या आयुष्यात सेटल्ड आहेत. खरंतर,माझ्या दोन्ही मुली माझ्यापेक्षा श्रीमंत आहेत. मी तर मजेमजेत त्यांना नेहमी सांगत असतो,''मला दोघींनी दत्तक घ्या .मी पण मग श्रीमंत होईन''. करिना-करिश्मा या बॉलीवूडमधल्या दोन प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. करिनाला आपण 'अंग्रेजी मीडियम' या सिनेमात पाहिलं होतं,त्यानंतर तिचा आमिर खानसोबतचा 'लालसिंग चड्ढा' हा सिनेमा १४ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. तर करिश्माही ओटीटी प्लॅटफॉर्मवर सक्रिय झाली आहे. तिची 'मेन्टलवूड' ही वेबसिरीज मागे प्रदर्शित झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT