rani mukherjee new movie, Mrs Chatterjee Vs Norway SAKAL
मनोरंजन

Rani Mukherjee: अभिनयाची 'राणी' पुन्हा येतेय.. नवीन भूमिका आणि नवीन सिनेमाची घोषणा

राणीच्या आगामी सिनेमातला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Devendra Jadhav

Rani Mukherjee New Movie: राणी मुखर्जी हि गेले अनेक महिने अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. बॉलिवूड मधली हि मर्दानी अभिनेत्री नवी सिनेमात कधी दिसणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. राणीचे चाहते सुद्धा तिच्या आगामी सिनेमाची आतुरतेने वाट पाहात आहेत. अखेर राणीच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. राणीचा नवीन सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

राणीच्या आगामी सिनेमातला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात राणीने सुंदर पिवळी साडी नेसली असून तिच्या कडेवर एक बाळ आहे आणि शेजारी एक मुलगा बसलाय. राणी या दोघांसोबत सेल्फी काढतेय. मिसेस चॅटर्जी vs नॉर्वे (Mrs Chatterjee Vs Norway) असं राणीच्या आगामी सिनेमाचं नाव आहे. सध्या राणीच्या आगामी सिनेमातला लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय

मिसेस चॅटर्जी vs नॉर्वे (Mrs Chatterjee Vs Norway) या सिनेमातला राणीचा आणखी एक लूक व्हायरल झालाय. गुलाबी साडी परिधान केलेल्या राणीच्या हातात एक टेडी बियर आहे, आणि भावुक नजरेने राणी पाहतेय. एकूणच राणीचा हा आगामी सिनेमा वेगळं कथानक घेऊन येतोय आणि राणीचा सुद्धा या नव्या सिनेमात जबरदस्त अभिनय अविष्कार पाहायला मिळणार, हे स्पष्ट होतंय.

बॉलिवूड मधले सुप्रसिद्ध दिग्दर्शक निखिल अडवाणी यांच्याकडे या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा आहे. राणीने शेवट 'बंटी और बबली २' सिनेमात काम केलं. अभिनेता सैफ अली खान सोबत राणीची जोडी जमली. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी झाला तरीही राणीच्या अभिनयाचं मात्र कौतुक झालं. मिसेस चॅटर्जी vs नॉर्वे हा सिनेमा १७ मार्च २०१३ ला रिलीज होतोय.

राणीने २१ एप्रिल २०१४ ला सध्या यशराज फिल्म्सचे सर्वेसर्वा असलेले आदित्य चोप्रा सोबत लग्न केलं. लग्नानंतर राणी अभिनय क्षेत्रातुन ब्रेक घेईल असं वाटलं होतं. परंतु लग्नानंतर काहीच महिन्यात आलेल्या मर्दानी सिनेमातून राणीने पोलीस ऑफिसरची भूमिका साकारून दमदार कमबॅक केलं. राणीचा नवा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट होणार कि फ्लॉप हे थोड्याच महिन्यात कळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitesh Karale Results : 'जेन झी'ची दुसरी पसंती काँग्रेस! नितेश कराळे गुरुजींच्या मतांचा भाजपाला मोठा फटका, 24 हजारांपेक्षा जास्त मतं घेत दिग्गज नेत्यांचे बिघडविले गणित

Supreme Court: पत्ता बदललेल्यांना ‘फॉर्म ६’ कशासाठी?; सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला विचारणा

Mhada: म्हाडाचे घर आणखी स्वस्त होणार! घरांच्या किमती ७-१० टक्क्यांनी घटणार; प्राधिकरणाच्या बैठकीत लवकरच निर्णय

Latest Marathi News Update : कुणाल मार्केट इमारतीत भीषण आग; 17 दुचाकी, 4 चारचाकी जळून खाक

Agriculture Assistant Bribery: लाचखोर कृषी सहायक एसीबीच्या जाळ्यात, ५५ हजारांची मागितली लाच, ४० हजार स्वीकारताना रंगेहाथ सापडला

SCROLL FOR NEXT