Ranveer Singh, Ayushmann Khurrana, manish paul FALL at Govinda's feet after dance at awards night 
मनोरंजन

Ranveer Sing: गोविंदा असा नाचला की रणवीर सिंगने भर स्टेजवर घातलं लोटांगण..

गोविंदाचा डान्स पाहून रणवीर सिंग, मनीष पॉल, आयुष्यमान खुराना यांनी केला साष्टांग नमस्कार..

सकाळ डिजिटल टीम

govinda - ranveer sing - manish paul - ayushmann khurana : ९० च्या दशकात गोविंदाचा डान्स म्हणजे मायकल जॅक्सनपेक्षा कमी नव्हता. अभिनया बरोबरच गोविंदा डान्समध्ये परफेक्ट आहे हे तर सांगायला नको. अनेक तरुण गोविंदाला डान्सरमधला गुरू समाजात. आज पण गोविंदाच्या डान्सची जादू कायम आहे आणि फिल्म इंडस्ट्रीत अनेक कलाकार गोविंदाला आपला आयकॉन मानतात. याच एक उदाहरण नुकतच समोर आलं आहे. यावेळी तर गोविंदाचा डान्स पाहून रणवीर सिंग, मनीष पॉल आणि आयुष्यमान खुराना यांनी गोविंदाला साष्टांग नमस्कार घातला.

(Ranveer Singh, Ayushmann Khurrana, manish paul FALL at Govinda's feet after dance at awards night)

दुबईमध्ये 'फिल्मफेअर' पुरस्कार सोहळ्यामध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी कार्यक्रमामध्ये गोविंदाने आपल्या नेहमीच्या शैलीत डान्स केला आणि त्यावेळी गोविंदाची पत्नी, मनीषा पॉल, आयुष्यमान खुराणा , रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर हे देखील गोविंदाच्या डान्सचा आनंद घेत होते.

गोविंदाचा डान्स संपताच रणवीर, आयुष्यमान, मनीष पॉल आणि अर्जुन कपूर ही गोविंदाकडे धावत गेले आणि गोविंदला स्टेजवर जाऊन साष्टांग नमस्कार घातला. हे सर्व पाहून गोविंदादेखील भावुक झाला.

नव्व्दच्या दशकांत गोविंदाने आपल्या डान्सने तमाम प्रेक्षकांना वेड लावलं होत. ‘आँखे’, ‘स्वर्ग’, ‘हाथकडी’, ‘दिवाना मस्ताना’, ‘कुली नंबर १’, यांसारखे सुपरहिट चित्रपट त्याने दिले आहेत. २००६ साली आलेल्या ‘पार्टन’र चित्रपटामुळे त्याने पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये आपली जादू दाखवून दिली. दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्याबरोबर त्याने अनेक चित्रपटात काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT