Ranveer Singh Get Best Actor Award At Flimfare Awards 2022 esakal
मनोरंजन

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळताच रणवीर रडला, दीपिकाला म्हणाला लक्ष्मी!

'विश्वास करणे अवघड आहे. मी एक अभिनेता बनलो आहे. हा एक चमत्कार आहे.'

सकाळ डिजिटल टीम

Ranveer Singh Become Emotional After Receiving Filmfare Best Actor : बाॅलीवूड अभिनेता रणवीर सिंग आपल्या उत्कृष्ट अभिनयाबरोबरच फॅशन सेन्ससाठी ओळखला जातो. नुकतचं अभिनेत्याला ६७ व्या फिल्फफेअर पुरस्कार सोहळ्यात (Flimfare Awards 2022) '८३' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

हा पुरस्कार मिळाल्यानंतर रणवीर खूपच भावूक झाला आणि तो आपले आनंदाश्रू आवरु शकला नव्हता. रणवीर सिंगने याचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला आहे.

रणवीरने शेअर केलेल्या व्हिडिओत दिसते की सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारासाठी रणवीर सिंगचे नाव पुकारतो. त्यानंतर रणवीर व्यासपीठावर येतो आणि आपल्या भावना व्यक्त करतो. मात्र या दरम्यान तो भावूक होतो व रडू लागतो. त्यानंतर तो म्हणतो, माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे, त्याची मी अपेक्षा ठेवली नव्हती. मला विश्वास बसत नाही की मी हे करत आहे आणि तुम्हा सर्वांसमोर उभा आहे.

विश्वास करणे अवघड आहे. मी एक अभिनेता बनलो आहे. हा एक चमत्कार आहे. या नंतर रणवीर सिंग (Ranveer Singh) म्हणतो, सर्वाधिक आभार मी माझ्या चाहत्यांचे मानू इच्छित आहे. माझ्या प्रवासाचा भाग बनण्यासाठी धन्यवाद ! मी आज जे काही आहे ते माझ्या आई-वडील आणि बहिणीमुळे आहे.

ते माझे देव आहेत. मी जे काही करतो ते माझ्या देवासाठी करतो. माझ्या घरी लक्ष्मी आहे आणि त्याच माझे रहस्य आहे. त्यानंतर रणवीर दीपिका पदुकोणला (Deepika Padukone) व्यासपीठावर घेऊन येतो आणि म्हणतो रणवीर सिंग पावर्ड बाय दीपिका पदुकोण !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News :...तर पुण्यात संध्याकाळी ७ पर्यंतच पेट्रोल पंप सुरु ठेऊ; पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा थेट इशारा, कारण काय?

Kolhapur Politics : संजय पाटील यड्रावकर आणि राजू शेट्टींचे पीए स्वस्तिक पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी, "तुमचा काय संबंध"; नगपरिषदेतच हाय व्होल्टेज ड्रामा

Latest Marathi Breaking News Live Update : नागपूरमध्ये काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून 221 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

Nagpur Land Survey : नवीन नागपूरसाठी जमिनीच्या संयुक्त मोजणीला सुरुवात; शेतकऱ्यांचे सहकार्य; विविध यंत्रणांचा सहभाग!

Pune Traffic : पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा; चारही महामार्ग जोडणारा ४५ किमीचा 'ट्विन टनेल' भूमिगत रस्ता प्रस्तावित

SCROLL FOR NEXT