ranveer singh birthday he reply on being asked if he wants a boy or girl in real life  sakal
मनोरंजन

Ranveer singh birthday : मुलगा हवा की मुलगी.. रणवीरनं दिलं भन्नाट उत्तर..

अभिनेता रणवीर सिंगचा आज वाढदिवस सध्या रणवीरला बाळाची ओढ लागली असून तो काय म्हणाला हे जरूर वाचा.

नीलेश अडसूळ

Ranveer singh birthday : बॉलीवूड मधील एक उत्तम नट, तितकाच उत्तम माणूस आणि सतत हस- हवतस राहणारा अभिनेता म्हणजे 'रणवीर सिंग'. रणवीर सिंगने सध्या बॉलीवूड वर त्याच्या नावाची मोहर उमटवली आहे. आजवर विविध चित्रपटांमधून त्याने साकारलेल्या भूमिकांमुळे मोठा चाहतावर्ग मिळवला. त्याचं कायम उत्साही राहणं अनेकांना प्रेरणा देऊन जातं. त्याचा स्वभाव आणि त्याचे काम यामुळे त्याचे चित्रपट पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. आज रणवीरचा (ranveer singh) वाढदिवस. त्याने ३७ व्य वर्षी पदार्पण केले असून चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील एक खास बात..

(ranveer singh birthday ranveer reply on being asked if he wants a boy or girl in real life)

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण (deepika padukon) वर्षभरापूर्वी विवाह बंधनात अडकले. त्या जोडीवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं. त्यांच्या विवाह सोहळाच नाही तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय घडतंय हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. कारण रणवीर आणि दीपिका दोघेही समाज माध्यमांवर अनेक गोष्टी शेअर करतात असतात. सध्या रणवीर आणि दीपिका आईबाबा कधी होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. रणवीरलाहि बाप होण्याची घाई झाली असली तरी रे पण ते आईबाबा कधी होणार, हा निर्णय त्यांनी घेतला आहे का आणि विशेष म्हणजे मुलगा हवा कि मुलगी यावर तो बोलला आहे.

नुकताच त्याचा 'जयेशभाई जोरदार' हा चित्रपट घेऊन गेला. लिंग निदान चाचणीचा उल्लेख आल्याने हा चित्रपट वादातही अडकला होता. याच चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान रणवीरने एका मुलाखतीत त्याला मुलगा हवा कि मुलगी हे सांगितले होते. यावेळी एका पत्रकाराने रणवीरला प्रश्न केला की,''रिअल लाइफमध्ये रणवीरला मुलगा हवा की मुलगी?'' यावर प्रतिक्रिया देताना रणवीर सिंग म्हणाला,''हे तर देवाच्या हातात आहे. जे तो देईल त्याचा मी आनंदानं स्विकार करेन''. तो पुढे म्हणाला,'''जयेशभाई जोरदार' या सिनेमात एक संवाद आहे की,जेव्हा आपण देवळात जातो तेव्हा प्रसाद म्हणून शिरा दिला किंवा लाडू दिले काय, आपण जो प्रसाद मिळेल तो आनंदाने स्विकारतो,नाक मुरडत नाही.'' तसंच आपण मुलांच्या बाबतीतही भेद करता कामा नये अशी सूचकता त्याने दर्शवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Statue of Liberty: काही सेकंदात भीषण दुर्घटना… स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अचानक कोसळली, थरारक VIDEO व्हायरल

Buldhana Accident: मंगरूळ नवघरे येथे काळी पिवळी आणि दुचाकीची भीषण धडक; ३५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Breaking: लागा तयारीला... BCCI ने जाहीर केली IPL 2026 च्या तारखा; फ्रँचायझींना ई-मेल अन्...

Kolhapur Young Footballers Meet Messi : वानखेडेवर ‘लय भारी’ क्षण; मेस्सीने खेळवले, टिप्स दिल्या आणि कोल्हापूरकरांचा अभिमान वाढवला

Municipal Corporation Election : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये स्वबळाचा नारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT