Ranveer Singh esakal
मनोरंजन

Ranveer Singh: 'अरे मी रणवीर सिंग, पत्रकार म्हणतो, ओळखत नाही'

बॉलीवूडचा अतरंगी अभिनेता रणवीर सिंग हा फॉर्म्युला रेस पाहायला गेला. तिथं गेल्यावर जे झालं ते आता सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Ranveer Singh Bollywood actor trolled: बॉलीवूडचा अतरंगी अभिनेता रणवीर सिंग हा फॉर्म्युला रेस पाहायला गेला. तिथं गेल्यावर जे झालं ते आता सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्यामुळे रणवीर सोशल मीडियावर ट्रोल होतो. चाहत्यांनी त्याच्याप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. एवढ्या मोठ्या अभिनेत्याचा अशाप्रकारे अपमान होणे हे चाहत्यांना काही आवडलेले नाही. त्यामुळे त्यांनी त्या पत्रकारावर सडकून टीका केली आहे.

जगभरामध्ये फॉर्म्युला वन हा प्रसिद्ध आहे. त्याचा मोठा प्रेक्षकवर्गही आहे, बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनाही त्या खेळाविषयी कुतूहल आहे. अशातच बॉलीवूडचा प्रख्यात अभिनेता रणवीर सिंग एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. त्याचे कारण त्याला पत्रकारानं डावलणं हे होतं. यामुळे रणवीरच्या भावना दुखावल्या गेल्या. आणि तो चाहत्यांच्या सहानुभूतीचा विषय ठरताना दिसतो आहे.

तो व्हिडिओ सुरु होताच एक पत्रकार रणवीरला काही प्रश्न विचारताना दिसून येतो. यावेळी रणवीर त्या पत्रकाराला आपली ओळख करुन देतो. मी रणवीर सिंग आणि बॉलीवूडचा अभिनेता आहे. मात्र यावर त्या पत्रकारानं रणवीरला जास्त काही विचारले नाही. त्यानं त्याच्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे रणवीर नाराज झाल्याचे दिसून आले. त्यानं पत्रकार मित्रानं आपल्याला दुर्लक्षित केलं. अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

रणवीरच्या त्या व्हिडिओवर त्याच्या चाहत्यांनी देखील नाराजी दर्शवली आहे. बॉलीवूडच्या एवढ्या मोठ्या अभिनेत्याला तो पत्रकार कसा काय ओळखत नाही ्सा प्रश्न रणवीरच्या चाहत्यांनी उपस्थित केला आहे. रणवीरनं शेयर केलेल्या त्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यापूर्वी देखील बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींना परदेशी पत्रकारांकडून अशाप्रकारची तिरकस वागणूक मिळाल्याची उदाहरणं नेटकऱ्यांनी दिली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: परप्रांतीय ऊसतोड मजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Pune Election Drama : एबी फॉर्मचा घोळ; नाराज इच्छुकांचे अर्ज; पुण्यात सर्वच पक्षांसमोर बंडखोरीचे संकट!

Chandrapur Crime : पद्मश्री नामांकित डॉक्टरांचा तपास; अवैध किडनी व्यवहारातील मोठे खुलासे; चंद्रपूर पोलिसांची विशेष कारवाई सुरु!

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Gold Rate: २०२६ मध्ये सोन्याचा दर २ लाखांपर्यंत पोहोचणार? ज्योतिषांचं भविष्याबद्दल भाकित, दर वाढीचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT