Ranveer Singh, Deepika Padukone Divorce News Ranveer Singh, Deepika Padukone Divorce News
मनोरंजन

Deepika Padukone : दीपिका-रणवीर घटस्फोट घेणार? एका कमेंटवरून मिळाले उत्तर

दीपिका कधी कधी पतीच्या पोस्टवर कमेंट करते

सकाळ डिजिटल टीम

Ranveer Singh, Deepika Padukone Divorce News दीपिका पादुकोण-रणवीर सिंगमध्ये (Ranveer Singh) सर्व काही ठीक नाही? दीपिका-रणवीर घटस्फोट घेणार? इतक्या अफवा पसरवल्या गेल्या. कितीतरी गोष्टी बोलल्या गेल्या. रणवीर आणि दीपिकाच्या (Deepika Padukone) लग्नाला अवघी ४ वर्षे झाली आहेत. परंतु, अफवा इतक्या जोरात आल्या की दोघे वेगळे होणार आहेत. आता दीपिकानेच याबद्दल मोठे भाष्य केले आहे.

मात्र, रणवीरची (Ranveer Singh) एक पोस्ट आणि दीपिकाच्या एका कमेंटने सर्व काही ठीक असल्याचे दिसून आले. होय, दीपिका आणि रणवीरमध्ये सर्व काही ठीक चालले आहे. बॉलिवूडचे हे पॉवर कपल अजिबात वेगळे होत नाही आहे. ही बाब ताज्या पोस्टवरून स्पष्ट झाली. रणवीरने नुकतेच त्याचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

फोटोंमध्ये तो नेहमीप्रमाणेच रंगीबेरंगी दिसत होता. ऑल पिंक लूकमध्ये रणवीर काही बबल गमसारखा गोड दिसत होता. गुलाबी जॅकेट, टी-शर्ट, पॅन्ट आणि शूजही गुलाबी होते. फॅशन जगतात असा लूक जरा जोखमीचा मानला जातो. रणवीरच्या या लूकचे सर्वांनाच वेड लागले होते. सगळे सोडा आपण दीपिकाबद्दल (Deepika Padukone) बोलू या...

दीपिका कधी कधी पतीच्या पोस्टवर कमेंट करते. दीपिकालाही हा लूक इतका आवडला की तिने एका शब्दात मजेशीर कमेंट केली. दीपिकाने रणवीरला खाण्यायोग्य असल्याचे सांगितले. रणवीरने याला उत्तर दिले? त्यांच्यातील प्रेम आजही कायम असल्याचे दोघांनी आपापल्या शैलीत व्यक्त केले.

दोघांमधील केमिस्ट्री कोणापासून लपून राहिलेली नाही. रणवीरच्या पोस्टवर दीपिकाची अशी रोमँटिक कमेंट पाहून दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे असा अंदाज यायला कोणाला वेळ लागला नाही. इथे काही अडचण नाही. जी काही उडालेली होती ती निव्वळ अफवा होती. विभक्त होण्याची चर्चा अफवा असल्याचे सिद्ध झाल्यावर या जोडप्याचे चाहते इतके उत्साहित झाले आहेत की टचवुडसारखे शब्द कमेंट बॉक्समध्ये लिहीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar Crime: प्रियकरासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर ६ जणांचा सामूहिक अत्याचार, निर्जन बंगल्यात नेतं कृत्य; प्रियकर गेला पळून

Annasaheb Patil Mahamandal : अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या एमडींची तडकाफडकी उचलबांगडी; अविनाश रणखांब नवे व्यवस्थापकीय संचालक

Rasalgad Fort History and Tourism : स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाचा जिवंत साक्षीदार! शिवकालीन दुर्गचे पर्यटकांना आकर्षण, निसर्गरम्य रसाळगडावर मोठी गर्दी

Marathi News Live Updates : चीनला चक्रीवादळाचा तडाखा; महाराष्ट्राला धोका नाही

Manoj Jarange: मोठी दुर्घटना टळली! जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा भीषण अपघात; ३ गाड्या एकमेकांवर आदळल्या, कार्यकर्ता जखमी

SCROLL FOR NEXT