Ranveer Singh fun with wify deepika padukone during instagram live session Instagram
मनोरंजन

Ranveer Singh: 'तुझ्या नरम हातांनी...',लाइव्ह सेशनमध्ये रणवीरची दीपिकाकडे भलतीच डीमांड, Video Viral

दीपिका आणि रणवीर अनेकदा एकमेकांच्या लाइव्ह सेशनमध्ये कमेंट करुन मजा आणत असतात पण यावेळी मात्र रणवीरनं अजब मागणी करत कहर केला आहे.

प्रणाली मोरे

Ranveer Singh: रणवीर सिंग आणि दीपिका पदूकोण नेहमीच एकमेकांच्या लाइव्ह व्हिडीओवर मजेदार प्रतिक्रिया करताना दिसतात. दीपिकानं नुकतंच आपलं एक नवं प्रॉडक्ट लॉन्च करताना इन्स्टाग्रामवर लाइव्ह सेशल घेतलं होतं,पण रणवीरनं त्यावर कमेंट करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.(Ranveer Singh fun with wify deepika padukone during instagram live session)

दीपिकानं त्या सेशनमध्ये आपल्या प्रॉडक्टच्या काही खास गोष्टी शेअर केल्या तेव्हा रणवीरनं त्यावर मजेदार कमेंट केली जी जोरदार व्हायरल झाली आहे. त्यानं लिहिलं आहे,''वा..वा...मला देखील स्कीनकेअर विषयी जाणून घेण्यात इंट्रेस्ट आहे''. तो म्हणाला,''आम्हीपण चेहऱ्यावर मॉश्चरायझर लावतो,थोडं स्वतःला मेंटेन ठेवणं चांगली गोष्ट आहे''. रणवीरनं पुढे लिहिलं आहे तो तर कहरच आहे...तो म्हणाला,''तुझ्या नरम हातांनी माझ्या चेहऱ्यावर मॉश्चरायझर लाव''. आता रणवीरच्या या कमेंटनंतर सोशल मीडियावर त्याची कमेंट हायलाइट करुन लोक नवीन मेजदार पोस्ट शेअर करताना दिसत आहेत.

याआधी एकदा रणवीर एक लाइव्ह सेशन करत होता,ज्यात तो रॅपर स्लो चीता सोबत इंटरॅक्ट करत होता,तेव्हा दीपिकानं कमेंट सेक्शनमध्ये तो कुठे आहे हे विचारलं होतं आणि डीनर प्लॅन विषयी देखील विचारलं होतं. तेव्हा देखील चाहत्यांनी खूप मजा लुटली होती. रणवीर आणि दीपिका बॉलीवूडचं सगळ्यात क्यूट कपल आहे जे अशी धम्माल करताना दिसतात अनेकदा.

Ranveer Singh fun with wify deepika padukone during instagram live session

'राम-लीला' सिनेमाच्या शूटिंग दरम्यान या दोघांमध्ये प्रेम झालं आणि त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोघांनी १४ नोव्हेंबर,२०१८ मध्ये आपल्या काही खास मित्रपरिवार आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. दीपिका आणि रणवीर एकमेकांना अनेकदा करिअरमध्येही पाठिंबा देताना दिसतात. सोशल मीडियावरही दोघं अनेकदा एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करताना दिसतात.

दीपिका लवकरच शाहरुखच्या 'पठाण' सिनेमात दिसणार आहे. तिच्या सिनेमातील 'बेशरम रंग' गाण्यावरनं जोरदार वाद उठला आहे. गाण्यात तिनं घातलेली भगव्या रंगाची बिकिनी अनेक धार्मिक संघटनांना खटकली आहे. अजूनतरी हा वाद शमण्याचं नाव घेताना दिसत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT