Ranveer Singh in maharashtrachi hasyajatra show on sony marathi with Circus team sakal
मनोरंजन

Ranveer Singh Circus: हास्यजत्रेच्या मंचावर रणवीर सिंगचा धिंगाणा.. थेट मंचावर येत..

रोहित शेट्टी, रणवीर सिंग यांची सर्कस रंगणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात..

नीलेश अडसूळ

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमाचे असंख्य चाहते आहेत. केवळ मराठीच नाही, तर इतर भाषिक लोकही हा कार्यक्रम तितक्याच आपुलकीने पाहत असतात. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचे चाहते दिग्गज कलावंत आणि मोठी व्यक्तिमत्त्वं आहेत आणि अशा कलावंतांनी हास्यजत्रेत सहभाग घेतला आहे. आता बॉलिवूडच्या शिखरावर पोचलेला दिग्गज अभिनेता रणवीर सिंग 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात प्रहसन सादर करणार आहे. लवरकच हा दमदार भाग प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

(Ranveer Singh in maharashtrachi hasyajatra show on sony marathi with Circus team)

समीर चौघुले,गौरव मोरे, शिवली परब, दत्तू मोरेंचे कलाकार रणवीर सिंग सोबत स्कीट सादर करणार आहेत. सोबत महाराष्ट्राचा एनर्जेटिक सुपरस्टार सिद्धार्थ जाधव देखील असेल. सर्कस सिनेमाची टीम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात धमाल करणार आहे.

विशेष म्हणजे ज्यावेळी सर्कस सिनेमाची शूटींग सुरु होती तेव्हापासूनच महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात जायचे अशी चर्चा कलाकारांमध्ये सुरु होती. शेवटी प्रदर्शनाची तारीख ठरली तेव्हा सगळ्या कलाकारांना महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात जाण्याची उत्सुकता होती. असे कलाकारांनी सांगितले. विशेष म्हणजे रणवीर सिंग यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा पाहायला सुरवात केली आणि सलग २तास ते महाराष्ट्राची हास्यजत्रा पाहताना मंत्रमुग्ध झाले. त्यांचा तो उत्साह आपल्याला महाराष्ट्राची हास्यजत्रा च्या या भागात आपल्याला पाहायला मिळेल.

त्या वेळी रोहित शेट्टी, रणवीर सिंग, पूजा हेगडे, जॅकलीन फर्नांडीस, वरुण शर्मा, सिद्धार्थ जाधव, अश्विनी काळसेकर आणि विजय पाटकर हे उपस्थित असणार आहेत आणि हास्याच्या मंचावर हास्याचे फटाके फुटणार आहेत. मंचावर एक वेगळीच ऊर्जा पाहायला मिळणार आहे. रोहित शेट्टी यांची सर्कस हास्यजत्रेच्या मंचावर आल्याने मंचावर घडलेली धमाल पाहणे ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे. १९ आणि २० डिसेंबर रोजी हे भाग प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate: कोकाटेंचं मंत्रिपद बीडच्या नेत्याला मिळणार? धनंजय मुंडेंना जबरदस्त धक्का देण्याची तयारी

IND vs SA, 4th T20I: धुक्यामुळे सामना रद्द! मग फॅन्सला तिकीटांचे पैसे परत मिळणार की नाही? BCCI चा नियम काय?

Sexual Assault Case : धक्कादायक! उसात नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधमांनी तिचे कपडे पळवून नेले अन् भेदरलेल्या अवस्थेत मुलीने...

Dolly Chaiwala Viral Video : डॉली चायवाल्याचा रॉयल स्वॅग ! टपरीवर चहा विकायला डिफेंडरमधून आला, लोक म्हणाले- डिग्र्या फाडून फेकून देऊ का?

Latest Marathi News Live Update : पुण्यात 25 ई डबल डेकर बस

SCROLL FOR NEXT