Ranveer Singh & Shahrukh Khan Esakal
मनोरंजन

Don 3: फरहाननं सिनेमाच्या कथेत केला 'हा' एक बदल अन् शाहरुखनं नाकारला 'डॉन 3'..आता रणवीर सिंगचं नाव चर्चेत

फरहान अख्तरनं कथेत केलेला बदल शाहरुखला पटला नाही म्हणून तो डॉन ३ मधून बाहेर पडल्याचं बोललं जात आहे.

प्रणाली मोरे

Don 3: 'पठाण' हा ब्लॉकबस्टर सिनेमा दिल्यानंतर शाहरुख खानची जादू पुन्हा एकदा लोकांना त्याच्या प्रेमात पाडून गेली आहे. किंग खानचे चाहते पुन्हा एकदा त्याला पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. नुकतीच शाहरुख खानविषयी एक मोठी बातमी समोर आली होती की फरहान अख्तरच्या 'डॉन ३' मधून तो बाहेर पडला आहे. या बातमीमुळे शाहरुखचे चाहते भलतेच नाराज झाले होते. आता याच बातमीच एक मोठी अपडेट समोर आली आहे.

बातमी समोर आली आहे की फरहानच्या सिनेमात आता डॉनची भूमिका शाहरुख नाही तर रणवीर सिंग साकारणार आहे. म्हणजे आता 'कई मुलकों के पुलिस..' शाहरुखला नाही तर रणवीरला शोधत फिरणार आहेत.

रिपोर्टनुसार मेकर्सनी 'डॉन ३' साठी ए लिस्टर अभिनेत्यांशी संपर्क साधला आहे. म्हटलं जात आहे की या हिट फ्रॅंचाइजीसाठी आता रणवीर सिंगच्या नावावर मोहोर उमटवली आहे. (Ranveer Singh will new don not shahrukh khan whats the reason)

मिळालेल्या माहितीनुसार शाहरुख खान सिनेमातून बाहेर झाल्यानंतर मेकर्सना अशा अभिनेत्याचा शोध होता ज्याच्यावर लोकांना विश्वास असेल. तो शाहरुखची कमी किमान भरून काढेल. खूप विचार विनिमय केल्यानंतर रणवीर सिंगचं नाव फायनल झालं आहे.

जर ही बातमी खरी निघाली तर रणवीरच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावर राहणार नाही. रणवीर सिंग जेव्हा जेव्हा पडद्यावर येतो धमाल करतो यात शंका नाही. अशात डॉन सारखी भूमिका तो पहिल्यांदाच करत आहे. शाहरुख सिनेमातून बाहेर पडल्यावर जिथे त्याच्या चाहत्यांची निराशा झाली आहे तिथे रणवीरचं नाव नवा डॉन म्हणून समोर आल्यावर त्याचे चाहते खुश झालेयत.

असं देखील म्हटलं जात आहे की मेकर्सनी रणवीर सिंगमसोबतच्या 'डॉन ३' सिनेमाची घोषणा करण्यासाठी एक व्हिडीओ देखील शूट केला आहे. लवकरच प्रॉडक्शन हाऊस रणवीरच्या या व्हिडीओला रिलीज करेल.

मेकर्सना देखील आता प्रोजेक्टसाठी आणखी उशीर नाही करायचा. बातम्यांनुसार,फरहान अख्तर तीन पिढ्या म्हणजे अमिताभ बच्चन,शाहरुख खान आणि जनरेशन नेक्स्ट स्टार अशा सर्वांना डॉन ३ साठी एकत्र आणण्याचा विचार करत होता. अर्थात शाहरुखला हा निर्णय फारसा आवडला नाही आणि म्हणूनच तो सिनेमातून बाहेर पडल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Marriage Scheme : शेतकरी वराशी विवाह करणाऱ्या वधूच्या नावावर 10 लाख ठेवा; शेतकरी संघाची मागणी, नोकरीत आरक्षणाचाही आग्रह

T20 World Cup: ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून बाहेर करून Super-8 मध्ये पोहचलेल्या झिम्बाब्वेचं चाहत्यांसोबत अनोखं सेलिब्रेशन; पाहा Video

YouTube Down Worldwide: जगभरातील लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म you tube अचानक बंद

Latest Marathi News Live Update : चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात लवकरच निवडणुका

आजचे राशिभविष्य - 18 फेब्रुवारी 2026

SCROLL FOR NEXT