Badshah Isha Rikhi  esakal
मनोरंजन

Rapper Badshah : डिजेवाले बाबूच्या हद्यात वाजली पुन्हा प्रेमाची रिंगटोन...

पत्नी जस्मिनसोबत घटस्फोट झाल्यानतंर ; ‘ह्या’ अभिनेत्रीला करतोय डेट

सकाळ डिजिटल टीम

आपल्या गाण्याने सर्वांना नाचायला भाग पाडणारा बादशहा हा एकदा पुन्हा प्रेमात पडलाय. बादशाह आपल्या खासगी आयूष्याबाबत सहसा जास्त माहिती देत नसतो. जस्मिनसोबत घटस्फोट घेतल्यानंतर तो आता पुन्हा प्रेमात पडलाय. होय, बादशाह सध्या पंजाबी अभिनेत्री ईशा रिखी हिला डेट करतोय.

बादशाह नुकताच ‘फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलीवूड वाईव्स' या वेब सीरिजमध्ये दिसला होता. यावेळी त्याने तो आता सिंगल असल्याचे करण जोहरला सांगितले होते.मात्र तो आता सिंगल नसून तो पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीला डेट  करत आहे.या दोघांची एका मित्राच्या पार्टीदरम्यान भेट झाली होती. ते लगेचच एकमेंकाच्या प्रेमात पडले.

खरंतर दोघांची चित्रपट आणि संगीताल्या रुचीने त्यांना एकमेकांच्या जवळ आणल्याचे बोलले जात आहे.हि दोघेही जवळपास एक वर्षापासून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. विषेश म्हणजे यांच्या दोघांच्या रिलेशनशिपबद्दल त्यांच्या घरच्यांनाही माहित आहे असून तेही आनंदी आहेत .

दरम्यान बादशाहाने किंवा ईशाने याची पुष्टी केलेली नाही तरीही दोघं आपल्या नात्याचा खुलासा कधी करतात याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागून आहे.

बादशाहचे त्यांच्या पत्नीसोबतचे नाते जास्त काळ टिकु शकले नाही.दोघंमध्ये वाद होत होते आणि त्यानंतर हे दोघेही वेगळे झाले. बादशाह आणि जस्मीनला एक मुलगी आहे.तिचं नाव जेसीमी ग्रेस मसीह सिंग आहे. या दोघी आता लडंनला राहतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT