Kanye West Titanium Teeth  esakal
मनोरंजन

Kanye West Titanium Teeth : रॅपर कान्ये वेस्ट याने बसवले टायटेनियमचे दात; खर्च ऐकून व्हाल आवाक्

अमेरिकन रॅपर कान्ये वेस्ट याने स्वतःला टायटेनियमचे दात बसवले आहेत. धक्कादायक म्हणजे त्याने नव्या दातांसाठी जुने खरेखुरे दात पाडून टाकले आहेत.

संतोष कानडे

नवी दिल्लीः अमेरिकन रॅपर कान्ये वेस्ट याने स्वतःला टायटेनियमचे दात बसवले आहेत. धक्कादायक म्हणजे त्याने नव्या दातांसाठी जुने खरेखुरे दात पाडून टाकले आहेत. त्याचे हे दात जेम्स बाँड चित्रपटातला विलन जॉर्जच्या दातांशी मिळते-जुळते आहेत.

डेंटल इम्प्लांटमध्ये टायटेनियम अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे शरीराला कुठलंही नुकसान होत नाही. म्हणून वेस्टने दात बदलण्याचा निर्णय घेऊन फॅन्सना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला आहे.

डेली मेलच्या माहितीनुसार, वेस्ट याने आपल्या इंन्स्टाग्राम पोस्टमध्ये फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्याने स्वतःची तुलना The Spy Who Loved Me and Moonraker च्या आयकॉनिक कॅरेक्टरशी केली आहे. कान्ये वेस्ट याचं वय ४६ वर्षे आहे. चाहत्याला अपमानित केल्याप्रकरणी त्याला कायदेशील अडचणींना सामोरं जावं लागलं होतं.

डेलीमेलच्या एक्स्लूझिव्ह फोटोंमध्ये वेस्टची दातं दिसत आहेत. त्याची नवीन दातं हिऱ्यांपेक्षाही महाग असल्याचं सांगितलं जात आहे. वृत्तानुसार रॅपर वेस्टने त्याला हवी तशी दातं बनवून घेतली. त्यामुळे त्याला ७ कोटी रुपये इतका खर्च लागला.

बेवर्ली हिल्सचे डेंटिस्ट Dr Thomas Connelly आणि Naoki Hayashi यांनी यांनी कान्ये वेस्टवर शस्त्रक्रिया केली. हे दोघेही नावाजलेले डेंटल टेक्निशियन आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chh. Sambhajinagar: गंगापूरजवळ कंटेनरची दुचाकीला भीषण धडक; शेंदूरवादा येथील तरुणाचा मृत्यू, एक गंभीर

Latest Marathi News Live Update : कुडाळच्या पिंगुळी बाजारपेठेत बनावट भांडी विक्रीचा पर्दाफाश

Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा कहर ! 'या' जिल्ह्यात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद, अनेक भागांत उष्णतेची लाट

Pune lifestyle Diseases: जीवनशैलीच्या आजारांचा तरुणाईला ‘संसर्ग’; पुण्यातील ७५ हजार जणांना उच्च रक्तदाब, ४४ हजार मधुमेहाच्या विळख्यात!

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे दोन हप्ते एकत्र? महिलांना मिळू शकतात थेट ३००० रुपये, पण पैसे नेमके कधी येणार?

SCROLL FOR NEXT