MC Stan wins Bigg Boss 16 SAKAL
मनोरंजन

Bigg Boss 16: पुण्यातील ताडीवाला रोडवर राहणारा एमसी स्टॅन झाला 'बिग बॉस 16'चा सम्राट

सकाळ ऑनलाईन टीम

MC Stan wins Bigg Boss 16 : एमसी स्टॅन हा पुण्यातील ताडीवाला रोडवर राहणारा गरीब कुटुंबातील मुलगा आहे. त्याने ' बिग बॉस 16" च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. तर मराठी बिग बॉस विजेता अमरावतीच शिव ठाकरे हा फर्स्ट रनर अप ठरला आहे. अभिनेता सलमान खान याने रविवारी रात्री एका दिमाखदार सोहळ्यात विजेत्यांच्या नावाची घोषणा केली.

एमसी स्टॅन हा भारतीय रॅपर आहे. तो प्रसिध्द अमेरिकन रॅपर एमिनेमचा चाहता आहे, एमिनेमला त्याच्या चाहत्यांनी स्टॅन हे नाव दिले. त्यावरूनच एमसी स्टॅनने स्वतः चे नाव एमसी स्टॅन असे ठेवलं आहे. इयत्ता आठवी मध्ये शिक्षण घेत असतानाच त्याला रॅप साँगचे वेड लागले. त्याच्या भावाने त्याची आवड ओळखून त्याला रॅप साँगचे शिक्षण दिले. त्यातूनच पुढे एमसी स्टॅन हा रॅप साँग लिहायला लागला आणि पुढे प्रसिद्धीच्या झोतात आला.

एमसी स्टॅनचे वडील रेल्वेमध्ये हवालदार पदावर कार्यरत आहेत. ते पुण्यातील ताडीवाला रोड भागात राहण्यास होते.त्याची आई गृहिणी आहे. 15 वर्षापूर्वी त्याच्या कुटुंबीयांनी पुणे सोडले असून सध्या ते मुंबई मध्ये वास्तव्य करीत आहेत. एमसी स्टॅनच्या विजयानंतर ताडीवाला रोड भागात जल्लोष करण्यात आला, अशी माहिती सुजित यादव यांनी दिली.

भारतासह जगभरात एमसी स्टॅन आपल्या रॅप गाण्यांद्वारे खूप लोकप्रिय आहे. त्याच घरातल्या ठराविक लोकांसोबत जास्त जमतं. आपल्या हटक्या बोलिभाषेमूळे किंवा त्याच्या अतरंगी राहणीमानामूळे तो चर्चेत राहणारा एमसी स्टॅन हा प्रसिद्ध रॅपर आणि हिप-हॉप गायक आहे.

स्वप्न बघितली कि ती पूर्ण होतात हे एम सी स्टॅनने जगाला दाखवून दिलं. एम सी स्टॅनचे जगभरातले फॅन्स त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic: मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी वाहतुकीवर कडक निर्बंध! अनेक रस्ते बंद; तर पार्किंगवर बंदी, मार्गदर्शक तत्त्वे काय?

Railway News: ट्रेन तिकीट बुक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आयआरसीटीसीकडून मोठे बदल; प्रवाशांना दिलासा, नवे अपडेट काय?

माओवाद्यांचा सर्वोच्च नेता थिप्परी तिरुपती उर्फ देवजीसह तेलंगणात शरण; दहा कोटींचे होते बक्षीस

‘माधुरीसोबत रोमाँन्स करताना मला...' इंटिमेंट सीनबद्दल बोलताना जॅकी श्रॉफ म्हणाले...'तिच्या डोळ्यात पाहिलं की...

Jalgaon Municipal Corporation जळगावकरांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे! ३०० फुटांच्या घरांची घरपट्टी यंदा तरी माफ होणार का?

SCROLL FOR NEXT