rashami desai 
मनोरंजन

रश्मी देसाईची असंवेदनशीलता; काबूलमधल्या भयावह परिस्थितीवर पोस्ट केला हसण्याचा इमोजी

रश्मी देसाईवर नेटकऱ्यांची टीका

स्वाती वेमूल

तालिबानने Taliban अफगाणिस्तानातील Afghanistan सत्ता काबीज केल्यानंतर तिथल्या नागरिकांची देशातून जीवघेणी पळापळ सुरू झाली. लोकांचे लोंढे काबूल Kabul विमानतळावर दाखल झाले. सोमवारी काबूलमध्ये अक्षरश: अनागोंदी माजलेली पहायला मिळाली. तालिबान्यांच्या दहशतीने भयभीत शेकडो नागरिक मुलाबाळांसह देश सोडण्यासाठी काबूल विमानतळावर जमले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत नागरिक धावपट्टीवरून धावताना दिसत आहेत. तर आणखी एका व्हिडीओत अमेरिकी सैनिक धावपट्टीवरील गर्दीला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार करीत असल्याचे दिसत आहे. महिला-पुरुष विमानात चढण्यासाठी धडपडत होते. मुले रडत होती, महिला आक्रोश करीत होत्या. सेलिब्रिटी फोटोग्राफर वीरल भयानीने काबूल विमानतळावरचे काही व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केले होते. यातील एका व्हिडीओवर अभिनेत्री रश्मी देसाईची Rashami Desai असंवेदनशील प्रतिक्रिया पहायला मिळाली.

या व्हिडीओत अनेक नागरिक धावपट्टीवर धावताना दिसत आहेत. तर स्वत:चा जीव वाचवून देशाबाहेर जाण्यासाठी विमानाच्या चाकावर बसलेले नागरिक यात दिसत आहेत. या व्हिडीओवर अभिनेत्री रश्मी देसाईने हसण्याचा आणि हात जोडल्याचा इमोजी पोस्ट केला. अत्यंत विदारक वास्तव दाखवणाऱ्या या व्हिडीओवर रश्मीने हसण्याचा इमोजी पोस्ट केला, यावरून अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे.

विमानाच्या चाकावर आणि पंख्यावर बसून देश सोडण्याचा प्रयत्न

एकाच वेळी शेकडो लोकांनी जबरदस्तीने अमेरिकी लष्करी विमानात घुसण्याचा प्रयत्न केला. काबूल विमानतळावरून उड्डाण घेणाऱ्या विमानाच्या चाकाला लटकलेल्या दोघांचा उंचावरून पडून मृत्यू झाल्याचं कळतंय. तर काही नागरिक विमानाच्या पंख्यावर बसून जीवघेणा प्रवास करताना दिसले.

गेली २० वर्षे अमेरिका आणि मित्रदेशांनी अफगाणिस्तानला सावरण्यासाठी आणि तिथली परिस्थिती बदलण्यासाठी मदत केली. अमेरिका, ब्रिटन आणि नाटोचे सैन्य तेथे ठाण मांडून होते. अमेरिकेने तिथून सैन्यमाघारीची घोषणा केल्यानंतर तालिबान्यांनी पुन्हा डोकं वर काढलं आणि संपूर्ण सैन्यमाघारीला दोन आठवडे उरले असताना काबूल ताब्यात घेतलं. तालिबानी सैन्याने एका आठवड्यात देशावर ताबा मिळवला. सरकारी फौजांनी त्यांच्यापुढे शरणागती पत्करली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT