Rashmi Desai gives answer to Trollers in interview  
मनोरंजन

'माझं शरीर, माझं क्लिवेज...'; बिगबॉस फेम रश्मी देसाई भडकली

वृत्तसंस्था

मुंबई : नुकताच बिग बॉसच्या १३व्या सिझनमध्ये गाजलेली अभिनेत्री म्हणजे रश्मी देशाई पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रश्मी व बिगबॉसमधला दुसरा सदस्य सिद्धार्थ शुक्ला यांच्या अफेअर्सच्या चर्चांनाही यावेळी उधाण आलं होतं. तसंच तिचं बिग बॉसमधल्याच अरहान खानसोबतच्या रिलेशनशिपबद्दलही जोरदार चर्चा झाली. मात्र, काही दिवसांपूर्वी तिला तिच्या कपड्यांवरून ट्रोल केलं गेलं, या ट्रोलर्सवर ती भडकली आणि त्यांना तिने खरमरीत शब्दांत उत्तर दिलं आहे. 

एका मुलाखती दरम्यान तिने तिची ट्रोलर्सबाबतची संतप्त भावना व्यक्त केली. तिच्या कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना ती म्हणाली की, 'मला माझं शरीर, साईज, मेकअप, कपडे, केस आणि क्लिवेज यावरून ट्रोल केलं गेलं. माझी शरीरयष्टी अशी आहे की माझं वजन सतत कमी-जास्त होत असतं. कित्येक जणांना माझे कपडे व माझा डान्स आवडत नाही. लोकांना माझ्या या गोष्टींचा प्रोब्लेम का आहे... हे शरीर माझं आहे, माझी मर्जी आहे. मी मला हवं ते योग्य वाटेल ते करेन. मी कसं वागायचं तो माझा हक्क-अधिकार आहेत.' अशा शब्दात तिने ट्रोलर्सचा समाचार घेतला. 

रश्मी तिच्या आयुष्यातही अत्यंत खंबीर आहे. अरहान खान याने बिगबॉसमध्ये विश्वासघात केला होता. त्यातूनही खचून न जाता ती उभी राहिली. सिद्धार्थ व तिच्या रिलेशनशिपबद्दलही खूप उलट-सुलट चर्चा झाली होती. मात्र, या सगळ्याला तोंड देत ती लढत राहिली आणि बिगबॉसमध्ये टॉप ५ मध्ये तिने स्थान कमावलं. तिने ट्रोलर्सला दिलेल्या या उत्तरावर तिचे चाहते खूप खुश आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT