Rashmika Mandana birthday inspirational life story  esakal
मनोरंजन

Rashmika Mandana Birthday : 'लोकांना अलिशान फ्लॅट दिसतो, त्यामागील कष्ट नाहीत!

फक्त कष्ट आणि कष्टच! रश्मिकाचा प्रेरणादायी संघर्ष! आता 'नॅशनल क्रश'

युगंधर ताजणे

Rashmika Mandana birthday : टॉलीवूडचा पुष्पा प्रदर्शित झाला त्यातील श्रीवल्लीनं प्रेक्षकांवर आपली वेगळी छाप उमटवली होती. श्रीवल्ली फेम रश्मिकाचा आज जन्मदिवस. या अभिनेत्रीनं आता केवळ टॉलीवूडच नाहीतर बॉलीवूडमध्ये देखील स्वताची वेगळी ओळख निर्माण केल्याचे दिसून आले आहे. रश्मिकाची ओळख ही आता नॅशनल क्रश झाली आहे. पण तिच्या संघर्षाविषयी फारसं कुणाला माहिती नाही.

आता रश्मिकानं गुडबॉयमधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यात ती बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसली. तिच्या भूमिकेचं कौतूक झालं. प्रेक्षकांनी वाहवा केली. यापूर्वी मराठीतील एका प्रसिद्ध पुरस्कार सोहळ्यात रश्मिकानं चंद्रा गाण्यावर केलेलं नृत्य प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच तिच्यावर कौतूकाचा वर्षाव झाला होता. रश्मिकाचं चाहत्यांनी मनापासून कौतूक केलं.

Also Read - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Cureency करकक्षेत

रश्मिका ही सध्या साऊथमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री झाली आहे. ती मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली आहे. कर्नाटक मधील कुर्ग या गावी राहणाऱ्या रश्मिकाचा सोशल मीडियावर असणारा चाहतावर्ग मोठा आहे. तिला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. काही दिवसांपूर्वी रश्मिकानं मुंबईमध्ये अलिशान फ्लॅट घेतल्याची बातमी व्हायरल झाली होती. असं म्हटलं जातं आज मोठ्या अलिशान फ्लॅटमध्ये राहणाऱ्या रश्मिकाच्या घरी प्रचंड गरिबी होती.

रश्मिकाचा आजवरचा प्रवास काही सोपा नव्हता. बऱ्याच लोकांना तिचा संघर्ष माहिती नाही. तिच्या पालकांकडे पैशांची कमतरता होती. रश्मिकानं हिंदूस्थान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की, माझ्या घरची गरिबी होती. अनेकदा किराणाचे पैसे देण्यासाठी आमच्याकडे पैसे नसायचे. घरभाडं देण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे रश्मिकाला पैशांचे महत्व चांगलेच माहिती आहे. तिनं मोठ्या कष्टानं स्वताची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या जोरावर आता अलिशान फ्लॅटची खरेदीही केली आहे.

Rashmika Mandana birthday

कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये लोकप्रियता मिळवल्यानंतर तिनं तेलुगू चित्रपट विश्वात पाऊल ठेवलं. तिनं चलो मधून डेब्यु केलं होतं. मात्र तिला फेम मिळाली ती गीता गोविंदम मधून. विजय देवरकोंडा सोबतची तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली. यानंतर मात्र रश्मिकानं मागे वळून पाहिलं नाही. पुष्पामधून तिची लोकप्रियता आणखी वाढली. आता ती नॅशनल क्रश झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Mahayuti Manifesto : महायुतीचा वचननामा जाहीर; मराठी माणसाला मुंबईतच घर ते बेस्ट प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत अन् बरंच काही...

Pune News: मांढरदेवीच्या यात्रेला अभूतपूर्व गर्दी; भोर मार्गावर दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, दाेन्ही बाजुला वाहतूक जाम!

Ankita Bhandari Murder : काय आहे अंकिता भंडारी खून प्रकरण? मुख्यमंत्र्यांनी दिले CBI चौकशीचे आदेश; जुन्या जखमा आणि नवा वाद!

Rhino Attacks Tiger : वाघाच्या जबड्यातून पिल्लाची सुटका! दुधवा जंगलात गेंड्याच्या मादीचा वाघावर थरारक हल्ला; दुर्मिळ दृश्य video viral!

Black Saree Look: काळ्या साडीतला बॉलिवूड टच देईल तुम्हाला एलिगंट अन् रॉयल लूक, कौतुक नक्की मिळेल!

SCROLL FOR NEXT